राज ठाकरे काय म्हणाले होते?
ठाण्यातील पदाधिकारी मेळावा संपल्यानंतर राज ठाकरेंनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यावेळी त्यांना मराठा आरक्षणावर प्रश्न विचारला गेला. त्यावर बोलताना राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या ऐवजी एकनाथ शिंदे यांना समोर उभा केलं अन् एकनाथ शिंदेंना आरक्षणाविषयी विचारा, असं उत्तर दिलं. मागच्या वेळी एकनाथ शिंदे यांनीच नवी मुंबईत जाऊन चर्चा केली होती. तर त्यांना यावर प्रश्न विचारला पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले होते. त्यावर जरांगे यांनी राज ठाकरेंची शाळा घेतली.
advertisement
जरांगे पाटील काय म्हणाले?
आम्ही तुम्हाला विचारलं का? मग तुम्ही आम्हाला का सल्ला देताय? एकदा तुम्ही भाजपसोबत जाता, नंतर पाठिंबा काढून घेता. तुम्ही 11 आमदार निवडून आणले तेव्हा आम्ही म्हटलं का की, आता बस्स करा.. मराठवाड्यात कशाला शिरता. केव्हापर्यंत तुम्ही भाजपची री ओढणार आहात? स्वतःचं पोरगं निवडणुकीत पाडलं. स्वतः ठाकरे ब्रँडचं अस्तित्व खराब करून घेताय, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
तुम्ही हुशार राजकारणी आहात. तुम्ही डोक्यानं वागलं पाहिजे, नाहीतर फडणवीस तुम्हाला संपवून टाकतील. तुम्ही त्यांच्या घरी जेवलात म्हणजे तुमचा कार्यक्रम लागलाच म्हणून समजा. गरीब मराठ्यांना सगळं कळतं. निवडणुका लागल्या कि तुम्हाला जवळ धरतात मात्र देत काहीही नाही, असं म्हणत जरांगे यांनी राज ठाकरेंना टोला लगावला.