मनोज जरांगे यांच्या समन्वयकांकडून एक पत्र राज्य सरकारला लिहिण्यात आलं आहे. आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण आंदोलनाबाबत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आमरण उपोषण आंदोलनस्थळ मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य करण्यासाठी आलेल्या मराठा बांधवांच्या मदतीसाठी व्यवस्थापन करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन war room स्थापन करण्याची मागणी केली आहे.
advertisement
माननीय महोदय,
आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले आमरण उपोषण चालू आहे. तथापि त्याबाबतचे नियोजन व्यवस्थापन सोई सुविधा यांचा अभाव दिसून येत आहे. आजची परिस्थिती पाहता आमरण उपोषण आंदोलन एक गंभीर वळणावर आली आहे. या ठिकाणी तत्काळ युद्धपातळीवर आपत्ती व्यवस्थान समिती स्थापन करण्याची गरज आहे. सदर व्यवस्थापन समितीत या आंदोलनाचे १० सदस्य असावेत तसंच सदर व्यवस्थापन समितीसाठी पोलिस अधिकारी डीसीपी, वाहतूक पोलीस, मुंबई महानगर पालिब्य मधील सक्षम अधिकारी, पाणी पुरवठा, आरोग्य अधिकारी, विद्युत पुरवठा, साफसफाई व स्वच्छता मह मलनिस्सारण बाबत महानगर पालिका अधिकारी यांचा समावेश असलेले अधिकारी यांची समिती स्थापन करणे गरजेचं आहे. आंदोलनकांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य धोक्यात येत आहे. या आंदोलनाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेल्या आंदोलकांना आणि विशेषतः मनोज जरांगे यांना आवश्यक तात्काळ आपत्कालीन सुविधा पुरवणे अत्यंत आवश्यक आहे.
१. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
आंदोलनस्थळी पिण्याच्या पाण्याचा तात्काळ पुरवठा करणे आवश्यक आहे. आमरण उपोषण करणाऱ्यांसाठी जलयुक्त वातावरण असणे खूप महत्त्वाचे आहे, जेणेकरून त्यांच्या शारीरिक स्थितीवर गंभीर परिणाम होणार नाही. पाणी पुरवठ्याच्या बाबतीत योग्य समन्वय राखावा.
२. शौचालय आणि यूरिनलची व्यवस्था
उपोषण आंदोलनाच्या ठिकाणी शौचालयांची व युरिनलची व्यवस्था अत्यावश्यक आहे. आआंदोलनाच्या ठिकाणी स्वच्छतेची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांची तत्काळ तैनाती करावी. स्वच्छता राखण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात.
३. आरोग्यविषयक सुविधा आणि मेडिकल किट.
आदोलन स्थळी तात्काळ मेडिकल टीमची व्यवस्था करणे आवश्यक आहे, विशेषतः मनोज दादांच्या आरोग्याची स्थिती व त्यावर होणारा परिणाम लक्षात घेता औषधे, जीवनदायिनी उपकरणे आणि तज्ञ डॉक्टरांची तात्काळ उपस्थिती सुनिश्चित करावी.
४. सुरक्षेसाठी पोलीस तैनात
आंदोलनाची स्थिती संवेदनशील असताना पोलिसांच्या सुरक्षेची तात्काळ व्यवस्था करणे आवश्यक आहे. तसेच आंदोलन स्थळावर होणाऱ्या गर्दीमुळे ट्रॅफिक व्यवस्थापनाची देखील काळजी घेतली जावी नागरिकांच्या सुरक्षिततेची प्राथमिकता असावी.
५. पावसाची परिस्थिती.
पावसाच्या मौसमात आंदोलनस्थळी असलेल्या लोकांना संरक्षण मिळवण्यासाठी तात्काळ निवास आणि अडकलेले पाणी काढण्यासाठी व्यवस्था करावी, पाणी साचू न देण्यासाठी माती, मुरुम आणि कचरा टाकण्याची तात्काळ व्यवस्था करावी.
६. जेवणाची आणि विश्रांतीची व्यवस्था.
आदोलनकर्त्यांना योग्य जेवणाची विश्रांतीची सुविधा पुरविणे आवश्यक आहे आंदोलन करणान्यांना शारीरिक आणि मानसिक ताण सहन करावा लागतो, त्यामुळे त्यांना विश्रांती, योग्य आहार आाणि शांत बातावरणाची आवश्यकता आहे
७. सामाजिक समन्वय व प्रशासनाची भूमिका.
आपत्कालीन व्यवस्येसाठी एक प्रभावी वॉर रूम जयार करणे, जेणेकरून सुसंगत समन्वय आणि त्वरित कार्यवाही केली जाऊ शकते. प्रशासनाने संघर्ष योदध्याच्या मागण्याशी संबंधित असलेल्या कोणत्याही समस्यावर सकारात्मक व तात्काळ कार्यवाही करावी
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या आमराण उपोषण आंदोलकांना तत्काल आणि प्रभावी प्रशासनिक उपाययोजना आवश्यकता आहे. आंदोलनकर्त्यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने या सर्व मुद्यांवर तत्काळ आणि संवेदनशील कार्यवाही करणे गरजेचे आहे. कृपया याबाबत त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश देऊन आमच्या आणि आंदोलकांच्या जीवनाच्या सुरक्षेसाठी आपण पुढाकार घ्यावा, तसंच आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली कोणतीही विपरीत परिस्थिती निर्माण झाल्यास आपण त्यास जबाबदार राहाल ह्याची नोंद घ्यावी, असंही या पत्रात नमूद केलं आहे.