मेट्रोच्या आणखी एका टप्प्याची तयारी पूर्ण
अंधेरी पश्चिम ते मंडाले या ‘मेट्रो 2 बी’ मार्गिकेचा पहिला टप्पा म्हणजे डायमंड गार्डन ते मंडाले हा भाग आहे. या टप्प्याला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) यांच्याकडून नुकतेच सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे आता या टप्प्याच्या उद्घाटनासाठी सर्व मार्ग मोकळे झाले आहेत.
Breaking News : वाहनचालकांनो लक्ष द्या, माळशेज घाटमार्गातील महत्त्वाची अपडेट आली समोर
advertisement
पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटनाची शक्यता
महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले की, सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर सरकारकडून मिळणाऱ्या वेळेनुसार लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडेल. सूत्रांनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मार्गिकेचं उद्घाटन 30 किंवा 31 ऑक्टोबर रोजी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. राज्य सरकार आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) या कार्यक्रमाची तयारी जोमाने करत आहेत.
प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा
या मार्गिकेचा पहिला टप्पा सुरू झाल्यानंतर मुंबईकरांना डायमंड गार्डन ते मंडाले दरम्यान थेट मेट्रोने प्रवास करता येणार आहे. यामुळे या परिसरातील रस्त्यावरील वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होईल आणि प्रवासाचा वेळही वाचणार आहे.
दोन टप्प्यांत मेट्रो 2 बीचे काम
मेट्रो 2 ए (दहिसर – अंधेरी पश्चिम) चा विस्तार म्हणून मेट्रो 2 बी प्रकल्प राबविण्यात आला आहे. सुमारे 22 किलोमीटर लांबीची ही मार्गिका दोन टप्प्यांत बांधण्यात येत आहे –
1) मंडाले ते डायमंड गार्डन
2) डायमंड गार्डन ते अंधेरी पश्चिम
या दोन्ही टप्प्यांमध्ये एकूण 22 मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्याच्या कामाला एप्रिल 2025 मध्ये सुरुवात करण्यात आली होती आणि विविध यंत्रणांच्या चाचण्या यशस्वीपणे पूर्ण झाल्या आहेत. या नव्या मार्गिकेमुळे अंधेरी, बीकेसी, चेंबूर आणि वडाळा परिसरातील प्रवाशांना मोठी दिलासादायक सुविधा मिळणार आहे.