मुंबई - स्वतःचे घर असावे, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यातल्या त्यात मुंबई आणि ठाण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये आपल्या हक्काचे घर असावे, असे असे बहुतांश जणांना वाटते. परंतु सामान्यांना घराच्या किमती प्रचंड असल्यामुळे स्वतःच्या हक्काचे घर खरेदी करता येत नाही. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी म्हाडाकडून अल्प दरात घरांसाठी लॉटरी काढण्यात येत असते.
प्रत्येक मुंबईकर म्हाडाच्या घरांसाठीचे लकी ड्रॉच्या दिवसाची वाट पाहत असतो. हा क्षण आता जवळ आला आहे. येत्या 8 ऑक्टोबरला काढण्यात येणार आहेत. याचबाबत लोकल18 चा हा स्पेशल रिपोर्ट.
advertisement
स्वप्नाचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईमध्ये स्वत:च्या हक्काच्या घरासाठी प्रत्येक मुंबईकर दिवस रात्र मेहनत घेत असतात. मुंबईमध्ये जास्तीत जास्त नागरिकांना घर मिळावे, याकरिता महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडाच्या वतीने मुंबई शहर आणि उपनगरातील नागरिकांना कमी दरात घर उपलब्ध करण्यात येतात. यंदा 8 ऑक्टोबरला म्हाडाच्या घरांची लकी ड्रॉ काढण्याची प्रक्रिया होणार आहे. या प्रक्रियेअंतर्गत लकी ड्रॉ काढण्यात येणार असून विजेत्यांच्या नावाची यादी जाहीर करण्यात येईल.
सध्या म्हाडाच्या घरांमध्ये काही घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहेत. तर काही घरांचे बांधकाम सुरू आहे. म्हाडाच्या जाहिरातीमध्ये जवळपास 2030 घरांच्या जाहिराती दिलेल्या होत्या. मात्र, त्यापैकी 70 टक्क्यांपेक्षा कमी घरांचे बांधकाम म्हणजेच 1500 घरांचे बांधकाम अपूर्ण राहिले आहे. यंदाच्या वर्षी महाडाच्या घरासाठी जवळपास 1 लाख 20 हजारांपेक्षा जास्त अर्ज आले होते.
यंदा विजेत्यांचा जरी लकी ड्रॉ मध्ये नंबर आला आणि लॉटरी लागली तरी घराचा ताबा मिळवण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल. तसेच काही घरांना ऑक्युपेशन सर्टिफिकेट लाभलेले नसल्याने घरांचा ताबा मिळवण्यास अडचण येणार आहे.