कधी पासून अर्ज भरता येणार?
मिळालेल्या माहितीनुसार, रहिवाशांना 27 जानेवारी सकाळी 10 वाजल्यापासून अर्ज भरता येईल. अर्जदारांनी नोंदणी 15 फेब्रुवारी रात्री 11.59 वाजेपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे.
म्हाडाच्या काही उपकरप्राप्त इमारती पाडण्यात आल्या आहेत आणि त्यांच्या मूळ जागेचा आकार, आरक्षण किंवा रस्त्याचा विस्तार यांसारख्या कारणांमुळे त्या पुन्हा बांधता येत नाहीत. काही इमारती पुन्हा बांधल्या गेल्या आहेत पण त्यात अपुरी सदनिका आहेत. अशा मूळ भाडेकरूंना किंवा त्यांच्या वारसांना ही अर्ज प्रक्रिया लागू आहे. हे रहिवासी पूर्वी कायमचे घर मिळालेले नाही आणि सध्या ते संक्रमण शिबिरात राहत आहेत.
advertisement
अर्ज कसा करावा?
अर्जदारांनी 'www.mhada.gov.in' या संकेतस्थळावरील 'Citizen Corner' मध्ये जाऊन 'Application for Master List' वर क्लिक करावे तसेच 'masterlist.mhada.gov.in' या संकेतस्थळावरून देखील अर्ज नोंदणी करता येईल. या प्रक्रियेद्वारे पात्र रहिवाशांना सदनिका वाटप केले जाईल आणि त्यांच्या घराच्या हक्काची खात्री केली जाईल. ही सोपी ऑनलाइन प्रक्रिया रहिवाशांसाठी घर मिळवण्याची संधी आहे त्यामुळे इच्छुकांनी वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे.
