advertisement

अजितदादांची चटका लावणारी एक्झिट, पुण्यातील दादांच्या जिजाई बंगल्यावर भावुक वातावरण Video

Last Updated:

Ajit Pawar: अजितदादांचे पुण्यातील जिजाई बंगला निवासस्थान हे अनेक राजकीय घडामोडींचे साक्षीदार राहिले आहे.

+
Ajit

Ajit Pawar Death: अजितदादांची चटका लावणारी एक्झिट, पुण्यातील दादांच्या जिजाई बंगल्यावर भावुक वातावरण Video

पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात स्पष्टवक्तेपणा, प्रशासनावरची पकड आणि दिलेला शब्द पाळणारा नेता अशी ओळख असलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन झाले. आज 28 जानेवारी सकाळी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अजितदादांच्या अकाली जाण्याने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. तर नेहमी कार्यकर्त्यांनी गजबजलेल्या त्यांच्या पुण्यातील जिजाई निवासस्थानी स्मशान शांतता आहे.
अजितदादा पवार यांनी बारामतीपासून राज्याच्या राजकारणापर्यंत दीर्घ आणि प्रभावी वाटचाल केली. सहा वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, प्रशासनातील बारकावे, कामातील शिस्त आणि पहाटेपासून कामाला सुरुवात करण्याची त्यांची सवय यामुळे ते कार्यकर्त्यांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्येही परिचित होते. निर्णयक्षमतेमुळे आणि थेट बोलण्याच्या शैलीमुळे ते कायम चर्चेत राहिले.
advertisement
सहा दशकांहून अधिक काळ सार्वजनिक जीवनात सक्रिय असलेल्या अजितदादांनी सिंचन, कृषी, पायाभूत सुविधा आणि ग्रामीण विकास या क्षेत्रांमध्ये ठोस कामगिरी केली. त्यांच्या नेतृत्वाखाली बारामती परिसरात झालेली विकासकामे हे त्यांच्या कार्यशैलीचे जिवंत उदाहरण मानले जाते. कार्यकर्त्यांच्या हाकेला धावून जाणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. पक्षांतर्गत राजकारण असो किंवा विरोधकांशी सामना, अजितदादांनी नेहमीच ठाम भूमिका घेतली.
advertisement
अजितदादांचे पुण्यातील जिजाई बंगला निवासस्थान हे अनेक राजकीय घडामोडींचे साक्षीदार राहिले आहे. या ठिकाणीच अनेक महत्त्वाचे निर्णय, चर्चा आणि बैठका झाल्या आहेत. त्यांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे. प्रशासनावर असलेली त्यांची पकड, कामातील शिस्त आणि दिलेला शब्द पाळण्याची वृत्ती महाराष्ट्राच्या जनमानसात कायम स्मरणात राहील, असं अजित पवार यांचं नेतृत्व होतं.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
अजितदादांची चटका लावणारी एक्झिट, पुण्यातील दादांच्या जिजाई बंगल्यावर भावुक वातावरण Video
Next Article
advertisement
Dharashiv ZP Election: आणखी एका पुतण्याकडून काकाला चॅलेंज, थेट भाजपसोबत हातमिळवणी, शिंदे गटाचं टेन्शन वाढलं
आणखी एका पुतण्याकडून काकाला चॅलेंज, थेट भाजपसोबत हातमिळवणी, शिंदे गटाचं टेन्शन व
  • महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 'काका विरुद्ध पुतण्या' असा संघर्ष नवा राहिलेला न

  • आता याच संघर्षाची ठिणगी शिवसेना शिंदे गटात पडली आहे.

  • धाराशिवच्या परंडा विधानसभा मतदारसंघात उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

View All
advertisement