महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल,महाराष्ट्रात देशातील पहिलं अनोखं क्लिनिक सुरू
Last Updated:
Indias First Menopause Clinic : महाराष्ट्रात महिलांसाठी राज्यव्यापी मेनोपॉज क्लिनिक सुरू होणार आहे. महिलांच्या जीवनमानासाठी महत्त्वपूर्ण आरोग्य उपक्रम हा ठरणार आहे.
मुंबई : महिलांच्या आरोग्याला महत्त्व देत महाराष्ट्रात शासकीय रुग्णालये आणि शहरी आरोग्य केंद्रांमध्ये स्वतंत्र मेनोपॉज क्लिनिक सुरू करण्यात आले आहेत. हा उपक्रम राज्यव्यापी असून महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे जे मेनोपॉज-केंद्रित आरोग्य सेवा देत आहे.
महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल
मेनोपॉज हा महिलांच्या जीवनातील संवेदनशील टप्पा असून या काळात हार्मोनल बदल, मानसिक अस्थिरता, झोपेतील अडचणी, हाडांचे दुर्बल होणे, हृदयविकाराचा धोका आणि मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. या समस्यांकडे पूर्वी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत पुरेसा लक्ष दिले जात नसे. त्यामुळे महिलांसाठी सर्वांगीण आरोग्य सेवा देणारी संस्था सुरू करणे महत्त्वाचे ठरले.
advertisement
क्लिनिकमध्ये मिळणार अत्याधुनिक सेवा
या क्लिनिकमध्ये महिलांना एका छताखाली हार्मोनल तपासणी, मानसिक आरोग्य सल्ला, हाडांची तपासणी, पोषण मार्गदर्शन आणि हृदयविकार प्रतिबंधक सल्ला मिळतो. मकर संक्रांतीच्या सुमारास या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून हे आरोग्यदायी आणि अर्थपूर्ण भेट म्हणून पाहिले जात आहे.
राज्यातील महिलांसाठी हा उपक्रम जीवनमान सुधारण्यासाठी आणि आरोग्यसंबंधी समस्यांचे वेळेत निराकरण करण्यासाठी मोठा पाऊल ठरला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 28, 2026 3:10 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल,महाराष्ट्रात देशातील पहिलं अनोखं क्लिनिक सुरू








