म्हाडाच्या कोकण मंडळाने जाहीर केलेल्या लॉटरी प्रक्रियेत सर्वसामान्यांना स्वस्तात घर मिळणार आहे. लॉटरीत अत्यल्प म्हणजे वार्षिक सहा लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या गटासाठी तब्बल चार हजार 802 घरे राखीव आहेत. तसेच नऊ लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या अल्प उत्पन्न गटातील कुटुंबासाठी 455 घरे राखीव आहेत. अर्ज प्रक्रियेला 14 जुलैपासून सुरुवात झाली असून नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
advertisement
13 ऑगस्टपर्यंत मुदत
म्हाडा लॉटरीसाठी 14 दिवसांत 21 हजार 951 हून अधिक जणांचे ऑनलाईन अर्ज आले आहेत. या लॉटरीसाठी 13 ऑगस्ट ही अंतिम मुदत असणार आहे. सध्या म्हाडाकडे आलेल्या अर्जंत अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटासाठीचे सर्वाधिक अर्ज आहेत.
दरम्यान, म्हाडाच्या विकासकांकडून लॉटरी विजेत्यांना घराचा ताबा देताना मुळ किमतीशिवाय विविध शुल्क आकारले जाते. त्या पार्श्वभूमीवर म्हाडाच्या सुरक्षा व दक्षता विभागाने परिपत्रक काढून कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.