गेल्या काही दिवसांपूर्वीच मुंबईसह 29 महानगर पालिकांची रणधुमाळी आटोपली. निवडणुकीनंतर आता मुंबईकरांच्या दृष्टीने आनंदाची बातमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून लवकरच 3000 घरांच्या घरांची लॉटरी काढण्याची प्रक्रिया वेगवान पद्धतीने सुरू करण्यात झाली आहे. मार्च 2026 मध्ये, घरांची लॉटरी निघण्याची दाट शक्यता आहे. मुंबई प्रमाणेच कोकण मंडळही नागरिकांसाठी घराची सोडत काढणार आहे. कोकण मंडळाकडून ठाणे, नवी मुंबई आणि विरार परिसरामध्ये 4000 घरांची सोडत काढण्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
advertisement
त्यामुळे येत्या उन्हाळ्यामध्ये मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि विरार सारख्या परिसरामध्ये नागरिकांच्या खिशाला परवडणाऱ्या किंमतीमध्ये घर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरिकांची या घराकडे नजरा लागल्या आहेत. खरंतर, म्हाडाने घरासोबतच, रस्ते, पाणी आणि वीज यांसारख्या पायाभूत सुविधांकडे विशेष लक्ष दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई मंडळाच्या सोडतीत प्रामुख्याने बी.डी.डी. चाळ पुनर्विकास, पत्रा चाळ आणि मोतीलाल नगर यांसारख्या मोठ्या प्रकल्पामधील घरांचा समावेश असण्याची शक्यता आहे. म्हाडाच्या 76 वर्षांच्या प्रवासात आतापर्यंत 9 लाख घरांची निर्मिती झाली असून, मार्चची ही लॉटरी सर्वसामान्यांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे. विशेष म्हणजे, बाजार भावापेक्षा निम्म्या किंमतीत ही घरे मिळत असल्याने दरवर्षीप्रमाणे, यावर्षीही अर्जांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
