मनसे १४० जागा लढवतेय आणि सत्ता द्या असं आवाहन तुम्ही करत आहात असं राज ठाकरेंना विचारलं असता त्यांनी म्हटलं की, १९५२ ला जनसंघाची स्थापना झाली. त्याचंच पुढे भाजप झालं, भाजप आता सत्तेत आली. ते सुरुवातीपासूनच सत्ता द्या सत्ता द्या म्हणत होते ना. प्रत्येक पक्ष तीच गोष्ट सांगतो. अपेक्षा असते की लोक ऐकतील आणि स्वप्न साकार होईल. प्रत्येकाचा मोठा काळ गेलेला असतो मोठा, जो स्वतच्या विचारावर ठाम असाल तर वेळ लागतो.
advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट आणि त्यानंतर पक्षाचे झालेले दोन गट यावरून राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष खोचक टीकाही केली. ते म्हणाले की, निवडून येणाऱ्या लोकांची मोळी बांधायची असेल शरद पवारांसारखी तर त्याला वेळ लागत नाही. पण एकदा का त्याची दोरी सुटली की लाकडं कुठं घरंगळत जातात हे त्याचं त्यालाच कळत नाही. त्यामुळे मी माझ्या विचारावर ठाम आहे. एक ना एक दिवस ते होईल असा विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला.
