साथीदारांनी फसवून लुटली लाखोंची रोकड
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार गणेश सिसोदिया हे त्यांचा मित्र मनोज पूजन यांच्यासोबत दादर फास्ट लोकलमधून प्रवास करत होते. याच वेळी आरोपी अमजद आणि त्याच्या साथीदारांनी त्यांना फसवून सहा लाख चाळीस हजार रुपयांची लूट केली. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर त्यांना मोठा धक्का बसला.
advertisement
सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपास
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे पोलिसांनी एक विशेष पथक तयार केले. या पथकाने आरोपींचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपास केला. तपासात असे उघड झाले की या संघटित टोळीने ही घटना नियोजनबद्ध पद्धतीने घडवून आणली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अहमद शेख, मंगलराज राय, तानाजी माने, राजू शेख, कृष्णा कानजोडकर आणि सुरेश कुलकर्णी यांचा समावेश आहे. हे सर्व आरोपी मुंबई आणि ठाण्यातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.
मनी लाँड्रिंग करण्याचा प्रयत्न
दरम्यान, पोलिसांनी दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेले फोन जप्त केले आहेत. अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, आरोपी फोन वॉलेट आणि ऑनलाईन माध्यमातून मनी लाँड्रिंग करण्याचा प्रयत्न करत होते. रेल्वे प्रवाशांनी या जलद कार्यवाहीचे कौतुक करत सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. उर्वरित रक्कम वसूल करण्यासाठी तपास अधिक तीव्र केला असून, टोळीत सहभागी असलेल्या इतरांचाही शोध घेत असल्याचं पोलिसांनी सांगितलं.