TRENDING:

Mumbai News : नरिमन पॉईंट ते मिरा- भाईंदर केवळ अर्ध्या तासात, मुंबईकरांची ट्रॅफिकची कटकट कायमची मिटणार; केंद्राची मोठी परवानगी मिळाली

Last Updated:

Mumbai Dahisar Mira Bhayandar Elevated Link Road : केंद्रीय मिठागार मंत्रालयाने आपली जमीन राज्य सरकारला हस्तांतरित केल्यामुळे दहिसर ते भाईंदर हा महामार्ग तयार करण्यातील मोठा अडथळा दूर झाला आहे. येत्या 3 वर्षात हा मार्ग तयार झाल्यानंतर नरिमन पॉइंट ते मिरा- भाईंदर हे अंतर कोस्टल रोड मार्गे केवळ अर्ध्या तासात कापता येणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: केंद्रीय मिठागार मंत्रालयाने आपली जमीन राज्य सरकारला हस्तांतरित केल्यामुळे दहिसर ते भाईंदर हा महामार्ग तयार करण्यातील मोठा अडथळा दूर झाला आहे. येत्या 3 वर्षात हा मार्ग तयार झाल्यानंतर नरिमन पॉइंट ते मिरा- भाईंदर हे अंतर कोस्टल रोड मार्गे केवळ अर्ध्या तासात कापता येणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
Mumbai News : नरिमन पॉईंट ते मिरा- भाईंदर केवळ अर्ध्या तासात, मुंबईकरांची ट्रॅफिकची कटकट कायमची जाणार; केंद्राची मोठी परवानगी मिळाली
Mumbai News : नरिमन पॉईंट ते मिरा- भाईंदर केवळ अर्ध्या तासात, मुंबईकरांची ट्रॅफिकची कटकट कायमची जाणार; केंद्राची मोठी परवानगी मिळाली
advertisement

म्हाडाकडून बंपर लॉटरी, पिंपरी चिंचवडमध्ये प्राईम लोकेशनवर फक्त ₹२० लाखांत घर...

मंत्री सरनाईक म्हणाले की, गेली 4-5 वर्ष सातत्याने केंद्रीय मिठागार मंत्रालय व राज्य शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे दहिसर- भाईंदर 60 मीटर रस्त्यामधील 53.17 एकर जागा केंद्रीय मिठागार मंत्रालयाने राज्य शासनाच्या माध्यमातून मीरा- भाईंदर महानगरपालिकेकडे हस्तांतर करण्याची मान्यता दिली आहे. सहाजिकच दहिसर ते भाईंदर आणि पुढे वसई - विरार कडे जाणारा रस्ता तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे नरिमन पॉईंट ते मीरा-भाईंदर हे अंतर आता कोस्टल रोड मार्गे केवळ एक अर्ध्या तासावर आले आहे.

advertisement

अंबाबाईच्या प्रसादाची होणार तपासणी! देवस्थान समितीने सांगितलं कारण

मुंबई महापालिकेच्या माध्यमातून कोस्टल रोड हा उत्तन पर्यंत येणार आहे. तेथून दहिसर -भाईंदर हा 60 मीटर रुंदीचा रस्ता मिरा रोड येथील सुभाष चंद्र बोस मैदानापर्यत येवून तिथून वसई विरार या दोन शहराला वसई विरार जोडला जाणार आहे. या रस्त्याची निविदा प्रक्रिया यापूर्वीच काढली आहे.हे काम एल. अँड. टी. ही कंपनी करणार असुन, पुढील तीन वर्षात हा प्रकल्प पूर्ण होईल. त्यासाठी येणारा 3 हजार कोटी रुपयांचा खर्च मुंबई महापालिका करणार आहे . कोस्टल रोड हा उत्तन येथून विरार कडे समुद्रकिनाऱ्यावरून जाणाऱ्या मार्गाला तेथील कोळी बांधवांनी विरोध केला होता.

advertisement

पुणेकरांनो देवीच्या दर्शनाला निघालात? बाहेर पडण्याआधी पाहून घ्या वाहतुकीतील बदल

रस्त्याची मागणी प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे मांडली आणि त्या मागणीला मान्यता मिळवली. त्यामुळे हा मार्ग उत्तन ते दहिसर आणि तेथून मीरा-भाईंदर मार्गे वसई विरारकडे जमिनीवरून जाणार आहे. त्यामुळे उत्तन येथील कोळी बांधवांच्या रास्त मागणीचा शासनाने सहानुभूती पुर्वक विचार केला आहे.असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.भविष्यात या मार्गामुळे मीरा-भाईंदर हे मुंबईची अधिक जोडले जाईल, व लवकरच मुंबई शहराचे उपनगर म्हणून आपली ओळख निर्माण करेल! असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News : नरिमन पॉईंट ते मिरा- भाईंदर केवळ अर्ध्या तासात, मुंबईकरांची ट्रॅफिकची कटकट कायमची मिटणार; केंद्राची मोठी परवानगी मिळाली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल