Pimpri Chinchwad News : म्हाडाकडून बंपर लॉटरी, पिंपरी चिंचवडमध्ये प्राईम लोकेशनवर फक्त ₹२० लाखांत घर; कसा अन् कुठे कराल अर्ज?

Last Updated:

Mhada Announced Pimpri Chinchwad News : म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीएसह सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील हजारो घरांची सोडत जाहीर करण्यात आली आहे.

News18
News18
मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना स्वत:चं घर खरेदी करण्यासाठी अनेक आर्थिक अडचणी येतात. अशा वेळी म्हाडा अनेकांना कमी किंमतीत हक्काचं घर खरेदी करण्याची सोय उपलब्ध करून देतं. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीएसह सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील हजारो घरांची सोडत जाहीर करण्यात आली आहे.
म्हाडाच्या पुणे विभागाकडून साडेचार हजार घरांची सोडत जाहीर करण्यात आली आहे. या मंडळांतर्गत पुणे, पिंपरी चिंचवड, सांगली, सातारा, सोलापूर तसेच कोल्हापुरमध्ये घरांची लॉटरी निघाली आहे. जाहीर करण्यात आलेल्या सोडतीमध्ये पुणे महापालिका क्षेत्रात 1538, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात 1534 आणि पुणे महानगर प्रदेशविकास प्राधिकरणमध्ये 1114 असे एकूण 4186 सदनिका आहे. तर म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य असं 1683 सदनिका तर म्हाडा पीएमएवाय योजनेतील सदनिका 299 असे एकूण 6168 सदनिकांसाठी सोडत निघाली आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दीड वर्षांत घरकुलांसाठी तीन सोडती काढल्या गेल्या होत्या. याचा फायदा सर्वसामान्यांना नक्कीच होईल. पिंपरी चिंचवड शहराचा वेगानं विकास होत आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड परिसरातील भागांमध्ये घरांची सोडत निघाली आहे. पिंपरी चिंचवड शहराजवळील चाकण आणि नेरे परिसरात म्हाडाच्या नवीन प्रकल्प राबविण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. 'म्हाडा'ने काढलेल्या घरांची सोडत 11 सप्टेंबरला करण्यात आली. 'म्हाडा'च्या घरांसाठी नागरिकांना 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी अर्जदारांनी प्रथम https://housing.mhada.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी.
advertisement
सोडतीसाठी अर्जाची प्रारूप यादी 11 नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. जर अर्जदारांना दावे किंवा हरकती दाखल करायचे असेल, ते ही ते करू शकात. त्याची अंतिम मुदत 13 नोव्हेंबर आहे. सोडतीसाठी अर्जाची अंतिम यादी 17 नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर संपूर्ण घरांची सोडत 21 नोव्हेंबरला केली जाणार आहे. पिंपरी चिंचवडमध्ये पुणे म्हाडा मंडळाकडून सोडत जाहीर केली. या घरांची किंमती 20 लाखांपासून सुरू होत आहे. 20 लाखांपासून ते 40 लाखांपर्यंत घरांच्या किंमती असणार आहेत.
मराठी बातम्या/पुणे/
Pimpri Chinchwad News : म्हाडाकडून बंपर लॉटरी, पिंपरी चिंचवडमध्ये प्राईम लोकेशनवर फक्त ₹२० लाखांत घर; कसा अन् कुठे कराल अर्ज?
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement