Pune News : पुणेकरांनो देवीच्या दर्शनाला निघालात? बाहेर पडण्याआधी पाहून घ्या वाहतुकीतील बदल

Last Updated:

Pune Navratrotsav Traffic : देशासह राज्यामध्ये अनेक ठिकठिकाणी देवीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. शिवाय अनेक ठिकाणी दुर्गा पूजेचेही आयोजन करण्यात येते. शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त विविध मंदिरांच्या परिसरात भाविकाची होणारी गर्दी विचारात घेऊन वाहतूक बदल करण्यात आले आहेत.

Pune Traffic
Pune Traffic
अवघ्या काही तासांवरच शारदीय नवरात्रोत्सव येऊन ठेपला आहे. देशासह राज्यामध्ये अनेक ठिकठिकाणी देवीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. शिवाय अनेक ठिकाणी दुर्गा पूजेचेही आयोजन करण्यात येते. शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त विविध मंदिरांच्या परिसरात भाविकाची होणारी गर्दी विचारात घेऊन वाहतूक बदल करण्यात आले आहेत. मुंबई, ठाणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूरसह पुण्यातही भाविकांची देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते. पुण्यातील प्रसिद्ध श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर, श्री चतु:शृंगी मंदिर, भवानी पेठेतील श्री भवानी माता मंदिर आणि सारसबागेतील श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात नवरात्रीमुळे वाहतुकीत बदल करण्यात आले आहे. या भागातील रस्ते वाहतुकीस बंद करण्यात आले आहेत.
राज्यामध्ये अनेक शहरा- शहरांमध्ये देवीचे मोठमोठे मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात. पुण्यामध्येही अशा मंदिरांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्या मंदिरांमध्ये नवरात्रीच्या काळामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. नवरात्रीच्या काळामध्ये पुण्यातल्या बुधवार पेठेमधील श्री तांबडी जोगेश्वरी मंदिराच्या परिसरात भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. सोमवारपासून (२२ सप्टेंबर) आप्पा बळवंत चौक ते बुधवार चौकापर्यंतचा (हुतात्मा चौक) रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. बुधवार चौक ते आप्पा बळवंत चौक दरम्यान एकेरी वाहतूक सुरु राहणार राहणार आहे. तर, लक्ष्मी रस्त्यावरील गणपती चौक ते श्री तांबडी जोगेश्वरी दरम्यानचा रस्ता वाहतुकीस बंद राहणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली.
advertisement
भाऊ रंगारीच्या इथून श्री तांबडी जोगेश्वरी मंदिराकडे जाणारा रस्ता सुद्धा वाहतुकीस बंद राहणार आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी तो रस्ता बंद नसणार नाही. श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर परिसरात आणि शनिवार पेठेतील श्री अष्टभूजा मंदिर परिसरात वाहन धारकांना वाहने लावण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. तर, श्री तांबडी जोगेश्वरी मंदिरात दर्शनासाठी येणार्‍या भाविकांनी वाहने नदीपात्रातील रस्त्यावर आणि मंडईतील वाहन तळावर लावण्याचे आदेश वाहतूक शाखेच्या पोलिसांनी दिलेली आहे. सेनापती बापट रस्त्यावरील श्री चतु:शृंगी मंदिर परिसरात गर्दी झाल्यास या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे. रस्त्यावरील गर्दी वाढल्यास सेनापती बापट रस्त्यावरील वाहतूक वेताळबाबा चौकमार्गे दीप बंगला चौक, ओम सुपर मार्केटमार्गे वळवली जाणार आहे.
advertisement
शिवाय, भवानी पेठेतील श्री भवानी माता मंदिर परिसरात वाहतूक बदल करण्यात आले आहे. नेहरु रस्त्या जवळून श्री भवानी माता मंदिराकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. नेहरु रस्ता ते श्री भवानी माता मंदिर परिसरात वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. गर्दी वाढल्यास नेहरु रस्त्यावरील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. श्रीसुक्त पठणानिमित्त मंगळवारी (२३ सप्टेंबर) सकाळी पाच ते सात दरम्यान सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात वाहतूक बदल करण्यात येणार असून स्वारगेटकडून सारसबागमार्गे स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्याकडे जाणारा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. मित्रमंडळ चौकाकडून पूरम चौकाकडे येणारा मार्ग वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. मित्रमंडळ चौकातून येणार्‍या वाहनांना सावरकर चौकातून सिंहगड रस्त्यामार्गे जिथे तुम्हाला जायचे आहे, तिकडे तुम्ही जाऊ शकता. तसेच सिंहगड रस्त्याने सावरकर चौकात येणार्‍या वाहनांनी लक्ष्मीनारायण चौकातून इच्छितस्थळी जावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे उपायुक्तांनी केले आहे.
मराठी बातम्या/पुणे/
Pune News : पुणेकरांनो देवीच्या दर्शनाला निघालात? बाहेर पडण्याआधी पाहून घ्या वाहतुकीतील बदल
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement