TRENDING:

Mumbai Ropeway: मुंबईचा पहिला रोप वे मुलुंड ते नॅशनल पार्क, कधी सुरू होणार काम?

Last Updated:

Mumbai Cable Car: मुंबईकरांसाठी खूशखबर असून लवकरच मुंबईतील पहिली केबल कार सुरू होणार आहे. त्यामुळे एक नवं पर्यटनस्थळ देखील उपलब्ध होणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: पर्यटनप्रेमी मुंबईकरांसाठी एक खूशखबर आहे. लवकरच मुंबईत केबल कार म्हणजेच रोपवे सुरू होणार आहे. मुलुंड ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ऐतिहासिक तीन मूर्ती मंदिरापर्यंत ही केबल कार धावणार आहे. विशेष म्हणजे मुंबईतील हा पहिलाच रोपवे असून तो राज्य सरकारच्या माध्यमातून होत आहे. पर्यटन विभागाने केलेल्या सूचनांनुसार या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पाठवण्यात येणार असून मुंबईकरांना लवकरच एक नवं पर्यटनस्थळ उपलब्ध होणार आहे.
मुंबईत या मार्गावर सुरू होणार पहिला रोप वे! कधी सुरू होणार काम?
मुंबईत या मार्गावर सुरू होणार पहिला रोप वे! कधी सुरू होणार काम?
advertisement

राज्य सरकारने काही वर्षांपूर्वीच मुंबईकरांसाठी रोपवे सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. नॅशनल पार्कमधील निसर्गाची मजा लूटत मुलुंड येथून थेट संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ऐतिहासिक तीन मूर्ती मंदिरापर्यंत जाण्याची योजना होती. परंतु, हा प्रकल्प गेल्या काही काळात कागदावरच राहिला होता. हा प्रकल्प लकवरात लवकर साकारण्यासाठी मुलुंडमधील लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकारी कार्यालयासोबत पत्रव्यवहार करून या प्रकल्पाचा अहवाल पर्यटन विभागाला पाठवण्याची मागणी केली होती. त्यानुसार लवकरच मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांच्याकडून अहवाल पर्यटन विभागाला सादर करण्यात येणार आहे.

advertisement

मुंबईकरांसाठी खूशखबर! लवकरच धावणार देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी, असा असेल मार्ग

तीन मूर्ती मंदिरात थेट जाण्याची सोय

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील नयनरम्य टेकडीच्या माथ्यावर तीन मूर्ती मंदिर आहे. सध्या या मंदिरात जाण्यासाठी भाविक आणि पर्यटकांना मोठी कसरत करावी लागते. मंदिरापर्यंत पायी जाताना ज्येष्ठ नागरिकांचे प्रचंड हाल होतात. त्यामुळे मंदिरात भाविकांना सहज प्रवेश मिळावा व नॅशनल पार्कचे सौंदर्य देखील पर्यटकांना पाहता यावे हा या रोपवेचा उद्देश असून याची मागणी गेल्या 5-6 वर्षांपासून येथील नागरिक आणि लोकप्रतिनिधी करत आहेत.

advertisement

मुंबईकरांसाठी नवं पर्यटनस्थळ

दरम्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संरक्षित हरित क्षेत्राला कोणतीही बाधा न आणता मंदिर परिसर पर्यटन स्थळ म्हणून विकसित केले जाणार आहे. यात ‘व्ह्यूइंग गॅलर’ सारख्या सुविधा देखील उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे भाविक आणि पर्यटकांची संख्या वाढणार असून मुंबईकरांसाठी एक नवं पर्यटनस्थळ उपलब्ध होणार आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Ropeway: मुंबईचा पहिला रोप वे मुलुंड ते नॅशनल पार्क, कधी सुरू होणार काम?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल