मुंबईकरांसाठी खूशखबर! लवकरच धावणार देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी, असा असेल मार्ग
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
Mumbai e-water taxi: मुंबईकरांसाठी वाहतुकीचा आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे. लवकरच मुंबईत ई-वॉटर टॅक्सी सेवा सुरू होत आहे.
मुंबई: देशातील पहिली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी आता मुंबईत धावणार आहे. गेटवे ऑफ इंडिया ते जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) दरम्यान ही टॅक्सी सेवा चालवण्यात येणार आहे. जेएनपीटी कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी ही सेवा लाभदायी ठरणार आहे. माझगाव डॉक शिपबिल्डिंग लिमिटेड (एमडीएल) आणि जेएनपीटी यांच्यातील करारानंतर ही सेवा पुढील महिन्यापासून नियमित सुरू होत आहे. विशेष म्हणजे या उपक्रमामुळे मुंबईच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला जाणार आहे.
मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या मोठी असून त्यावर उपाय म्हणून जलमार्गाला प्राधान्य देण्याचा प्रयत्न होतोय. त्यासाठी यापूर्वीही वॉटर टॅक्सी आणि रोपॅक्स फेरी सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती आणि पर्यायाने महागड्या तिकीट दरांमुळे या सेवांना मुंबईकरांनी प्रतिसाद दिला नाही. या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रॉनिक टॅक्सीची संकल्पना पुढे आलीये.
advertisement
भारतीय बनावटीची ई-टॅक्सी
दरम्यान, सुरुवातीला ही इ-टॅक्सी परदेशातून विकत घेण्याचा विचार ता. परंतु, माझगाव डॉक शिपबिल्डिंग लिमिटेडने (एमडीए) स्वत:च इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी तयार करण्याचा निर्णय घेतला. तसेच त्यांची निर्मितीही यशस्वी पूर्ण केलीये. ‘एमडीएल’ने तयार केलेल्या दोन इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सीची सेवा ते स्वत: पुरवणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांसाठी वाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.
advertisement
कशी आहे ई-वॉटर टॅक्सी?
ई-वॉटर टॅक्सीची लांबी 13.27 मीटर असून रुंदी 3.05 मीटर आहे. या टॅक्सीची आसन क्षमता 25 प्रवशांची आहे. यामध्ये 64 किलोवॅटची बॅटरी असून ती एकदा चार्जिंग केल्यावर 4 तास चालू शकते. तर टॅक्सीचा वेग 14 नॉट्सपर्यंत राहणार आहे. विशेष म्हणजे या ई-वॉटर टॅक्सीत वातानुकूलित सुविधा उपलब्ध असणार आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 21, 2025 8:48 AM IST