TRENDING:

घरी बायको-पोरं, तरी बाहेर लफडं, मुंबईतील प्रेयसीनं घरी बोलवून गुप्तांगच कापलं, मग...

Last Updated:

Mumbai News: कंचनदेवीने गेल्या काही काळापासून पत्नीला सोडून तिच्याशी विवाह करण्याचा तगादा लावला होता. त्यासाठी ती सातत्याने दबाव टाकत होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: नववर्षाच्या दिवशी एका धक्कादायक घटनेने सांताक्रुझ परिसर हादरला. पत्नीला सोडून नवा संसार थाटण्यासाठी तगादा लावत प्रेयसीनेच प्रियकराचे गुप्तांग छाटले. कालिना येथील जांभळीपाडा भागात हा प्रकार घडला असून जोगिंदर महतो (वय 44) असं प्रियकराचं नाव आहे. याप्रकरणी 25 वर्षीय प्रेयसी कंचनदेवीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.
घरी बायको-पोरं, तरी बाहेर लफडं, मुंबईतील प्रेयसीनं घरी बोलवून गुप्तांगच कापलं, मग...
घरी बायको-पोरं, तरी बाहेर लफडं, मुंबईतील प्रेयसीनं घरी बोलवून गुप्तांगच कापलं, मग...
advertisement

नेमकं घडलं काय?

जोगिंदर महतो हा विवाहित असून त्याला मुलं देखील आहेत. मात्र, त्याचे कंचनदेवी महतो हिच्यासोबत गेल्या सहा ते सात वर्षांपासून प्रेमसंबंध होते. कंचनदेवीने गेल्या काही काळापासून पत्नीला सोडून तिच्याशी विवाह करण्याचा तगादा लावला हता. त्यासाठी ती सातत्याने दबाव टाकत होती. त्यामुळे जोगिंदरच्या कुटुंबात तणावाचे वातावरण होते. त्यामुळे तो नोव्हेंबर 2025 मध्ये गावी बिहारला निघून गेला होता.

advertisement

सोशल मीडियावर मैत्री, तरुणासाठी पुण्यातील मुलीनं घर सोडून गाठलं कोल्हापूर, पण पुढं नको ते घडलं

कंचनदेवीची धमकी आणि...

कंचनदेवी नेहमीच जोगिंदरला फोन करून मुंबईत परत येण्याची आणि तिच्याशी लग्न करण्याची धमकी देत होती. 19 डिसेंबरला जोगिंदर मुंबईत आला आणि 24 डिसेंबरला कंचनदेवीला भेटला. त्याने तिला समजावून सांगितले की त्याला पत्नी आणि दोन मुलं आहेत. पण कंचनदेवी त्याचं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. काहीही न ऐकता ती त्याच्यावर दबाव टाकत होती.

advertisement

नवीन वर्षाच्या निमित्ताने बोलावलं अन्...

1 जानेवारी 2026 रोजी नववर्षाच्या निमित्ताने कंचनदेवीने जोगिंदरला घरी बोलावले. जोगिंदर तिच्या घरी पोहोचताच तिने त्याच्यावर हल्ला केला. धारदार शस्त्राने त्याचे गुप्तांग छाटले. जोगिंदर रक्तबंबाळ अवस्थेत तिथून निघून आपल्या घरकुलाकडे गेला. जिथे त्याच्या मुलांनी त्याला तातडीने व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल केले. त्याच्या जखमा गंभीर असल्याने त्याला सायन रुग्णालयात हलवले गेले. शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असल्याची माहिती आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हळद खातीये चांगलाच भाव, शेवगा आणि डाळींबाला आज काय मिळाला दर? इथं चेक करा
सर्व पहा

दरम्यान, वाकोला पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून कंचनदेवीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात अधिक तपास सुरू आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
घरी बायको-पोरं, तरी बाहेर लफडं, मुंबईतील प्रेयसीनं घरी बोलवून गुप्तांगच कापलं, मग...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल