TRENDING:

अबबब... 556 कोटींचा खर्च अन् 4 लाख चौरस फूट क्षेत्रफळ; मुंबईत भारतातील सर्वात मोठ्या क्रुझ टर्मिनलचं उद्घाटन

Last Updated:

Mumbai International Cruise Terminal : मुंबईमध्ये देशातील सर्वात मोठ्या अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलचे उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या भव्यदिव्य टर्मिनलचं उद्घाटन करण्यात आले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबईमध्ये देशातील सर्वात मोठ्या अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलचे उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या भव्यदिव्य टर्मिनलचं उद्घाटन करण्यात आले. 20 सप्टेंबर 2025 (शनिवार) मुंबईच्या बॅलार्ड पिअरवरील अत्याधुनिक मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलचं (MICT) उद्घाटन पार पडलं. हे टर्मिनल 'क्रूझ भारत मिशन'अंतर्गत तयार करण्यात आलं आहे. या क्रूझमुळे भारताला जागतिक क्रूझ पर्यटनाच्या नकाशावर अधिक मजबूत होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
News18
News18
advertisement

नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी धो धो कोसळणार, सोमवारी 26 जिल्ह्यांना अलर्ट

इंदिरा डॉक येथे 556 कोटींमध्ये तयार करण्यात आलेले अत्याधुनिक टर्मिनल सध्या जगभरामध्ये कमालीचं चर्चेचं विषय ठरलं आहे. सध्या सोशल मीडियावर या मुंबईतील आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलची जोरदार चर्चा होत आहे. सरकारच्या 'क्रूझ भारत मिशन'अंतर्गत विकसित केलेले हे टर्मिनल मुंबईला क्रूझ पर्यटनासाठी जागतिक केंद्र बनवण्याचे उद्दिष्ट ठेवते. शिवाय, भारताच्या सागरी पायाभूत सुविधांमध्येही एक मोठी भर घालते. 4,15,000 चौरस फूट क्षेत्रफळामध्ये विस्तारलेल्या टर्मिनलचं सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलमधून दरवर्षी 10 लाख प्रवासी प्रवास करू शकतात.

advertisement

सैन्य दलात वैद्यकीय अधिकार्‍यांच्या २२५ पदांसाठी भरती जाहीर, असा करा अर्ज...

तर, एकाचवेळी या टर्मिनलवर ११ मीटरच्या ड्राफ्टसह ३०० मीटर लांबीच्या पाच क्रूझ सहज थांबू शकतात. तर, एकाच दिवशी किमान 10,000- 15,000 तरी प्रवासी प्रवास करू शकतात, इतकी क्षमता या आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलची आहे. सध्या सोशल मीडियावर क्रूझ टर्मिनलमधील अनेक फोटोज् व्हायरल होत आहेत. पाण्याच्या लाटांची डिझाईन असलेल्या छत असलेल्या हॉलला भारतीय क्रूझ पर्यटनाचे प्रवेशद्वार म्हटलं जात आहे. समुद्राच्या लाटांसारखे दिसण्यासाठी डिझाइन केलेलं छत सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. अनेक अत्याधुनिक सुख सुविधांनी तयार केलेल्या या क्रूझ टर्मिनलने प्रत्येकाचेच लक्ष वेधले आहे.

advertisement

10 मिनिटांत ट्रेन फुल्ल... दलालांना त्रासलेल्या प्रवाशांना दिलासा देणारी बातमी

advertisement

टर्मिनलमध्ये चेक-इन आणि इमिग्रेशनची सुविधा प्रवाशांना कोणत्याही अडचणीशिवाय मिळू शकणार आहे. तब्बल 72 चेक-इन आणि इमिग्रेशन काऊंटर तयार करण्यात आहे. यामुळे, प्रवाशांचा वेळ आणि प्रवास आरामदायी करण्याचा प्रयत्न करणार आहे. या आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलमध्ये एकाचवेळी 300 हून अधिक वाहने पार्किंगमध्ये पार्क करू शकतील, इतकी क्षमता आहे. केंद्रीय पोर्ट, शिपिंग आणि वॉटरवेज मंत्री सर्बानंद सोनोवाल या टर्मिलनबद्दल म्हणाले, मुंबईचा समुद्री इतिहास अत्यंत गौरवशाली आहे आणि हा आपल्या सभ्यतेचा महत्त्वाचा भाग आहे. मुंबई नेहमीच एक प्रमुख किनारा केंद्र राहिलं आहे. ज्याने आपल्या व्यस्त सागरी व्यापाराद्वारे देशाच्या अर्थव्यवस्थेत आणि विकासात मोठी भूमिका बजावली आहे.

advertisement

नवरात्रीमध्ये देवीच्या दर्शनासाठी PMPML ची पर्यटन बससेवा, तिकिटाची किंमत किती?

देशामध्ये सांस्कृतिक पर्यटनाला चालना देणे आणि पर्यावरणीय शाश्वतता मजबूत करणे, असे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. एमआयसीटी भारताच्या क्रूझ पर्यटन क्षेत्राला मोठी चालना देईल अशी अपेक्षा आहे. सरकारने 'क्रूझ इंडिया मिशन'अंतर्गत या टर्मिनलला जागतिक मानकांनुसार विकसित केले आहे. आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल सुरू झाल्यामुळे मुंबई केवळ भारतातच नाही तर आशियातील एक प्रमुख क्रूझ टूरिजम डेस्टिनेशन म्हणून नावारुपास येईल. याशिवाय भारताच्या समुद्राची अर्थव्यवस्था आणखीनच मजबूत होईल.

मराठी बातम्या/मुंबई/
अबबब... 556 कोटींचा खर्च अन् 4 लाख चौरस फूट क्षेत्रफळ; मुंबईत भारतातील सर्वात मोठ्या क्रुझ टर्मिनलचं उद्घाटन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल