AFMS Bharti 2025 : सैन्य दलात वैद्यकीय अधिकार्यांच्या २२५ पदांसाठी भरती जाहीर, १.२० लाखांपर्यंत पगार, असा करा अर्ज...
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
AFMS Bharti 2025 : इंडियन आर्मीमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नुकतेच इंडियन आर्मीमध्ये तरुणांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. आर्मीमध्ये मेडिकल ऑफिसर पदासाठी भरती केली जाणार आहे.
इंडियन आर्मीमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नुकतेच इंडियन आर्मीमध्ये तरुणांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. आर्मीमध्ये मेडिकल ऑफिसर पदासाठी भरती केली जाणार आहे. भरती प्रक्रिया सुरू झाली असून लवकरात लवकर इच्छुक उमेदवारांनी या नोकरीसाठी अर्ज करावा. 'SSC मेडिकल ऑफिसर' पदासाठी कोणकोणती पात्रता आहे, शिवाय कोणकोणत्या ठिकाणी ही नोकरभरती होणार आहे. जाणून घेऊया...
भारतीय सशस्त्र सेनेमध्ये म्हणजेच इंडियन आर्मीमध्ये नोकरभरती होणार आहे. ही भरती 'SSC मेडिकल ऑफिसर' पदासाठी केली जाणार आहे. महिला आणि पुरुष या दोघांसाठीही नोकरभरती वेगवेगळ्या पद्धतीने केली जाणार आहे. 'SSC मेडिकल ऑफिसर' पदासाठी महिलांसाठी 56 राखीव पदे आहेत. तर, पुरुषांसाठी 169 पदे राखीव ठेवण्यात आले आहेत. भरती प्रक्रिया ऑनलाईन केली जाणार असून इच्छुक उमेदवारांनी https://join.afms.gov.in/# या वेबसाइटवर जाऊन अर्ज प्रक्रिया करायची आहे. 13 सप्टेंबर पासून सुरू झालेल्या अर्ज प्रक्रियेचा अखेरचा दिवस 03 ऑक्टोबर आहे.
advertisement
225 रिक्त पदे असलेल्या भरतीमध्ये उमेदवाराच्या वयाची अट 30 ते 35 वर्षापर्यंत आहे. अर्ज प्रक्रिया जरीही ऑनलाईन असली तरीही उमेदवारांची निवड मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. सर्वच अर्जदारांसाठी 200 रूपये अर्जाचे शुल्क असणार आहे. हे शुल्क सुद्धा अर्जदारांना ऑनलाईन पद्धतीनेच भरायचे आहे. आर्मी हॉस्पिटल (R&R), दिल्ली कॅन्ट येथे 11 नोव्हेंबरपासून उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे. मुलाखतीची शेवटची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. 'SSC मेडिकल ऑफिसर' पदासाठी MBBS ची पदवी अनिवार्य आहे. शिवाय, राज्य वैद्यकीय परिषदेने MCI आणि NBE या मान्य असलेल्या पदव्युत्तर पदवी धारक देखील अर्ज करू शकतात. सोबतच उमेदवाराकडे 31 जुलै 2025 पूर्वी इंटर्नशिप केलेली सर्टिफिकेटची आवश्यकता आहे.
Location :
Maharashtra
First Published :
September 21, 2025 7:11 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
AFMS Bharti 2025 : सैन्य दलात वैद्यकीय अधिकार्यांच्या २२५ पदांसाठी भरती जाहीर, १.२० लाखांपर्यंत पगार, असा करा अर्ज...