TRENDING:

Mumbai Local Accident: लाईफलाइन ठरली डेथलाईन! कोणत्या कारणांनी रेल्वे रुळावर पडले प्रवासी? समोर आली धक्कादायक माहिती...

Last Updated:

Mumbai Local Train Accident : आज सकाळी 10 ते 12 प्रवासी ट्रेनमधून पडल्याची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. दिवा स्थानकातही दोन प्रवासी पडले असल्याची माहिती समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अजित मांढरे, प्रतिनिधी, ठाणे: ऐन गर्दीच्या वेळी धावत्या ट्रेनमधून प्रवासी ट्रॅकवर पडल्याची माहिती मिळाली आहे. दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान ट्रेनमधून पडून 6 प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या अपघातानंतर रेल्वे रुळांवर रक्ताचा सडा दिसून आला. तर, काही मृत प्रवाशांचे मृतदेह प्लॅटफॉर्मवर ठेवण्यात आल्याने प्लॅटफॉर्मवरही रक्ताने माखले असल्याचे अस्वस्थ करणारे चित्र दिसून आले. या अपघाताचे कारण समोर आले आहे.
लाईफलाइन ठरली डेथलाईन! कोणत्या कारणांनी रेल्वे रुळावर पडले प्रवासी? समोर आली धक्कादायक माहिती...
लाईफलाइन ठरली डेथलाईन! कोणत्या कारणांनी रेल्वे रुळावर पडले प्रवासी? समोर आली धक्कादायक माहिती...
advertisement

आज सकाळी 10 ते 12 प्रवासी ट्रेनमधून पडल्याची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर आता दिवा स्थानकातही दोन प्रवासी पडले असल्याची माहिती समोर आली आहे. हे दोन्ही प्रवासी महिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या महिला जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

प्रवासी नेमके कोणत्या ट्रेनमधून पडले?

समोर आलेल्या माहितीनुसार, टिटवाळ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकलमधील प्रवासी पडले असल्याची माहिती समोर आली आहे. आज सोमवारचा दिवस आणि कामावर जाण्याची घाई यामुळे लोकलमध्ये प्रचंड गर्दी असते. या गर्दीमुळेच प्रवाशांचा घात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, हे प्रवासी पुष्पक एक्स्प्रेसमधील असल्याचे काहींनी म्हटले होते. मात्र, रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, टिटवाळाहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या ट्रेनमधून प्रवासी ट्रॅकवर पडले. प्रवाशांनी खच्चाखच भरलेल्या ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी होती. 6 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

advertisement

अपघात कसा झाला?

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. पुष्पक एक्स्प्रेस आणि लोकल एकाच वेळी विरुद्ध दिशेने बाजूने वेगाने गेले. त्यावेळी दरवाजामध्ये असलेल्या प्रवाशांना तोल सांभाळता आला नाही. त्यामुळे प्रवाशी रेल्वे रुळावर पडले आणि अपघात झाला असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.  रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात झाल्यानंतर कसारा लोकलच्या गार्डने या अपघाताची माहिती रेल्वे प्रशासनाला दिली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
वाहन ब्लॅकलिस्ट टाळायचंय? काय होतात त्याचे परिणाम? संपूर्ण माहितीचा Video
सर्व पहा

एका प्रत्यक्षदर्शीने न्यूज 18 लोकमतला दिलेल्या माहितीनुसार सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेनमधून प्रवासी पडले.  त्यातील 8 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local Accident: लाईफलाइन ठरली डेथलाईन! कोणत्या कारणांनी रेल्वे रुळावर पडले प्रवासी? समोर आली धक्कादायक माहिती...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल