टिटवाळ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकलमधील प्रवासी पडले असल्याची माहिती समोर आली आहे. आज सोमवारचा दिवस आणि कामावर जाण्याची घाई यामुळे लोकलमध्ये प्रचंड गर्दी असते. या गर्दीमुळेच प्रवाशांचा घात झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
या कारणाने घेतला गेला रेल्वे प्रवाशांचा बळी....
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातातील पीडित प्रवासी हे लोकलमधील प्रवासी आहेत. एक लोकल सीएसएमटीच्या दिशेने जाणारी आणि एक कल्याण-कसाराच्या दिशेने जाणारी लोकल एकाच वेळी आल्या. त्यावेळी दिवा-मुंब्रामधील एका वळणावर दोन्ही लोकलमधील प्रवासी हे एकमेकांना धडकले आणि रेल्वे रुळावर पडले, असल्याची घटना घडली. मुंबई लोकल ट्रेनच्या इतिहासातील हा पहिलाच असा विचित्र अपघात असल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
दरम्यान, मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील लीला यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त प्रवासी हे लोकलच्या दरवाजात उभे होते, अशी माहिती समोर आली आहे. लोकलच्या दरवाजात उभं राहून प्रवास करणे धोकादायक असल्याचे त्यांनी म्हटले.
एका प्रत्यक्षदर्शीने न्यूज 18 लोकमतला दिलेल्या माहितीनुसार सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेनमधून प्रवासी पडले. त्यातील 8 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.
