सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमध्ये महिलांमध्ये तुफान हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वीच विरार लोकलमध्ये एका महिलेला रक्त येईपर्यंत मारहाण केल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा एकदा अशाच प्रकारची घटना समोर आल्याने प्रवासी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
व्हिडिओमध्ये महिलांना एकमेकींच्या झिंज्या ओढत, शिवीगाळ करत आणि हातघाईवर उतरताना पाहायला मिळत आहे. इतर प्रवासी स्तब्ध होऊन हा प्रकार पाहत आहेत. तर, काहींनी भांडणे सोडवण्यासाठी आरडाओरड केला असल्याचे दिसून आले. काहींनी या घटनेचा व्हिडिओ शूट केला.
advertisement
हाणामारी नेमकी कशामुळे झाली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, गर्दीच्या तुफान वेळेत जागेवरून किंवा चढताना झालेले वाद अशा घटना घडण्यास कारणीभूत ठरतात, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.
मध्य रेल्वेवर अनेकदा लोकल वेळेवर धावत नसतात. त्याच्या परिणामी लोकल ट्रेनला गर्दीचे प्रमाण वाढते. गर्दीच्या वेळी प्रवाशांमध्ये रेटारेटी, बसण्याच्या मुद्यावरून भांडण होत असतात.
