सहाव्या मार्गिकेचे काम हाती घेतल्यामुळे पाचवी लाईन (Fifth Line) पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे आणि त्यामुळे ही सर्व्हिस रद्द करावी लागत आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, "ब्लॉक दरम्यान रेल्वे दररोज रात्री 11:30 ते 4:30 या वेळात काम हाती घेतले जाणार आहे. या वेळात रद्द केली जाणारी लोकल सेवा किती असेल याचा निर्णय रात्रीच ठरवला जाईल. याबद्दलची माहिती रेल्वेची अधिकृत वेबसाइट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध करण्यात येईल."
advertisement
पाचवी लाईन बंद असल्यामुळे अनेक मेल- एक्सप्रेस ट्रेन आणि लोकल वेगवेगळ्या मार्गांनी वळवण्यात येणार आहेत. काही मेल- एक्सप्रेस ट्रेन आणि लोकल काही स्टेशनवर थांबू शकणार नाहीत किंवा वेगवेगळ्या मार्गावरून वळवल्या जाणार आहेत. मिळालेल्या माहितीप्रमाणे गोरेगाव आणि बोरिवली दरम्यान मेल- एक्सप्रेस ट्रेन आणि लोकल फास्ट मार्गांवरून चालवण्यात येणार आहे. हा ब्लॉक नवीन वर्षाच्या (31 डिसेंबर) काळात सुद्धा लागू राहणार आहे, मात्र रेल्वे प्रशासनाने त्या दिवशी प्रवाशांच्या वाढलेल्या मागणीनुसार सभोवताली रद्द सेवा कमी करण्याचा प्रयत्न देखील केला जाणार असल्याचे सांगितले आहे.
