TRENDING:

Mumbai Local: विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूरकरांचे रविवारी मेगाहाल! मुंबई लोकलबाबत महत्त्वाचं अपडेट

Last Updated:

Mumbai Local: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी असून रविवारी तुमच्या प्लॅनचा लोकलमुळे खोळंबा होण्याची शक्यता आहे. 4 आणि 5 ऑक्टोबरला तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रविवारी मध्य रेल्वे मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या वेळापत्रकात मोठे बदल झाले असून काही गाड्या रद्द तर काही मार्ग बदलून धावतील. माटुंगा ते मुलुंडदरम्यान धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावरून धावतील. परंतु, जलद मार्गावर फलाट नसल्याने या लोकल विद्याविहार, कांजूरमार्ग आणि नाहूर रेल्वे स्थानकांवर थांबणार नाहीत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय आणि हाल होण्याची चिन्हे आहेत.
Mumbai Local: विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूरकरांचे रविवारी मेगाहाल! मुंबई लोकलबाबत महत्त्वाचं अपडेट
Mumbai Local: विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूरकरांचे रविवारी मेगाहाल! मुंबई लोकलबाबत महत्त्वाचं अपडेट
advertisement

मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक

कुठे: माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धिम्या मार्गावर

कधी : रविवारी सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 पर्यंत

Thane – Borivali Tunnel: ठाणे ते बोरिवली अवघ्या 12 मिनिटांत! ट्विन टनेलबाबत महत्त्वाची अपडेट

हार्बर मार्ग व ट्रान्सहार्बर मार्ग

कुठे: पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गांवर

advertisement

कधी: रविवारी सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 पर्यंत

पश्चिम रेल्वे मेगाब्लॉक

पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे.

कुठे : माहीम ते सांताक्रूझ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर

कधी: शनिवारी रात्री 1 ते पहाटे 4.30 पर्यंत

भायखळा येथे ब्लॉक

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुण्यात इथं मिळते प्रसिद्ध लेमन टी, चव अशी की एकदा प्याल तर पुन्हा याल
सर्व पहा

भायखळा स्थानकावर तांत्रिक कामानिमित्त शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे.  परळ ते भायखळादरम्यान अप जलद मार्गावर शनिवारी रात्री 12.30 ते पहाटे 4.30 पर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. यामुळे कोणार्क आणि हावडा-सीएसएमटी एक्स्प्रेस दादर स्थानकापर्यंत चालवण्यात येतील. गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच बाहेर पडावे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local: विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूरकरांचे रविवारी मेगाहाल! मुंबई लोकलबाबत महत्त्वाचं अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल