TRENDING:

BMC Mumbai School : मुंबई महानगरपालिकेच्या शाळा झाल्या 'स्मार्ट', तंत्रज्ञानाच्या मदतीने मिळणार शिक्षण, 18 हजारहून अधिक विद्यार्थ्यांना लाभ

Last Updated:

महाराष्ट्र राज्य आणि संपर्क फाउंडेशन यांच्या समन्वयाने विकसित झालेल्या ‘संपर्क स्मार्ट शाळा’ उपक्रमाचा शुभारंभ बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 135 शाळांमध्ये करण्यात आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
BMC initiate Sampark Smart School : महाराष्ट्र राज्य आणि संपर्क फाउंडेशन यांच्या समन्वयाने विकसित झालेल्या ‘संपर्क स्मार्ट शाळा’ उपक्रमाचा शुभारंभ बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 135 शाळांमध्ये करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे महानगरपालिकेच्या शाळांमधील 18 हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना दृकश्राव्य माध्यमातून शिक्षण मिळणार आहे. या उपक्रमामुळे शिक्षण विभागातील नवीन संकल्पनांच्या मदतीने प्रत्येक विद्यार्थी प्राथमिक शिक्षण पूर्ण करू शकणार आहे.
BMC Mumbai School
BMC Mumbai School
advertisement

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या प्रमुख उपस्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत संपर्क स्मार्ट शाळा उपक्रमाच्या माहितीपत्रकाचे, संपर्क दूरदर्शन संचाचे अनावरण करण्यात आले.

संपर्क फाउंडेशनचा हा उपक्रम देशातील ८ राज्यांमध्ये राबविण्यात येत आहे. एक कोटी ८० लाख विद्यार्थ्यांपर्यंत हा उपक्रम पोहोचला आहे. महाराष्ट्रात १३ हजार शाळांमध्ये हा उपक्रम सुरू झाला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परळ, दादर, भायखळा, घाटकोपर, चेंबूर, भांडूप, कुर्ला, सांताक्रूझ, गोरेगांव आणि बोरिवली येथील मिळून एकूण १३५ शाळांमध्ये हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. शिक्षकांच्या क्षमतांचा विकास करणे, अध्यापन पद्धती सोपी करणे हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट्य आहे.

advertisement

२०० शिक्षकांना प्रशिक्षण

या उपक्रमात प्रत्येक शाळेसाठी एलइडी टीव्ही संच, २७३ दूरदर्शन संच, शिक्षकांसाठी स्मार्ट शाळा अॅप्लिकेशन, पाठ योजना, पाठ्यपुस्तकातील धड्यांवर आधारित २७०० व्हिडिओ, मूल्यमापनासाठी वस्तुनिष्ठ प्रकारातील ३० हजार प्रश्न आदी शैक्षणिक बाबींचा समावेश आहे. यासाठी महानगरपालिकेच्या २०० शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी म्हणाले, शिक्षणाची पुढची पायरी ठरणाऱ्या ‘संपर्क स्मार्ट शाळा’ उपक्रमात बृहन्मुंबई महानगरपालिका सहभागी झाली आहे. शिक्षण क्षेत्रातील हा आमूलाग्र बदल आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही अनेक शाळांपर्यंत पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान (एफएलएन) उपकरणे पोहोचविणार आहोत. ही उपक्ररणे वापरण्यास सुलभ असल्यामुळे शिक्षकांना त्याचा वापर करता येणार आहे. विद्यार्थ्यांना याचा थेट फायदा होणार आहे. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना डिजिटल साक्षर करण्यास मदत होणार आहे. महानगरपालिका हा उपक्रम पुढे नेण्यास सक्षम आहे, असे गगराणी यांनी नमूद केले.

advertisement

संपर्क स्मार्ट शाळा उपक्रमाचे संस्थापक अध्यक्ष विनीत नायर यांनी संपर्क स्मार्ट शाळा उपक्रमाचा विस्तार सांगितला. शैक्षणिक क्षेत्रात येत्या काळात या उपक्रमाद्वारे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.

मराठी बातम्या/मुंबई/
BMC Mumbai School : मुंबई महानगरपालिकेच्या शाळा झाल्या 'स्मार्ट', तंत्रज्ञानाच्या मदतीने मिळणार शिक्षण, 18 हजारहून अधिक विद्यार्थ्यांना लाभ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल