मुंबई : स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यातील काही महानगरपालिकांनी मांसविक्रीवर बंदी घालण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण तापलेलं असतानाच आता पुन्हा दोन दिवस कत्तलखाने बंद ठेवण्यात येणार आहे. जैन समाजासाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या पर्युषण काळात दोन दिवस कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका आयु्क्तांनी घेतला असून या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे. मंगळवारपासून पर्युषण पर्वास सुरूवात झाली आहे.
advertisement
जैन समाजासाठी पर्युषणकाळ पवित्र मानला जातो. या काळात मुंबईत दोन दिवस कत्तलखाने बंद ठेवण्यात येणार आहे. मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या द्विसदस्य खंडपीठापुढे सुनावणी झाली . शेठ मोतीशॉ लालबाग जैन चॅरिटीज आणि शेठ भेरूलालजी कन्हैयालालजी कोठारी धार्मिक ट्रस्टनं दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. पर्युषण काळात नऊ दिवसांऐवजी एकच दिवस कत्तलखाने बंद ठेवण्याच्या महानगरपालिका आयुक्तांच्या 30 ऑगस्ट 2024च्या निर्णयाला याचिकाकर्त्यांनी दिले आव्हान होते. त्यानंतर आता सुधारित आदेशात दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
नेमकी काय होती याचिका?
जैन समाजासाठी पर्युषण पर्व हा अतिशय पवित्र काळ मानला जातो. त्यामुळे 20 ते 27 ऑगस्टदरम्यान मुंबईतील सर्व कत्तलखाने आणि मांसविक्री बंद ठेवण्यात यावी, अशी याचिकेत मागणी करण्यात आली आहे. मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठापुढे शेठ मोतीशॉ लालबाग जैन चौरटीज आणि शेठ भेरूलालजी कन्हैयालालजी कोठारी धार्मिक ट्रस्टने केलेल्या सुनावणीवेळी याचिकेवरील महापालिकेच्या वकिलांनी ही माहिती दिली. पर्युषण काळात नऊ दिवसांऐवजी एकच दिवस कत्तलखाने बंद ठेवण्याच्या महापालिका आयुक्तांच्या 30 ऑगस्ट 2024 च्या निर्णयाला याचिकाकर्त्यांनी आव्हान दिले होते.
जैन धर्मात पर्युषण पर्वाचे महत्त्व?
जैन धर्मातील काही महत्त्वपूर्ण धार्मिक उत्सवांमध्ये पर्युषण पर्वाचे वेगळे महत्त्व आहे. जैन समाजाचा सर्वाच पवित्र उत्सव मंगळवारपासून सुरू झाला आहे. पर्युषण पर्व सुरू होण्यापूर्वीच जैन बांधवांनी सर्व मंदिर, धार्मिक स्थळांची साफसफाई पूर्ण केली आहे. पर्युषण पर्वाला जैन समाजातील सर्वात मोठे पर्व मानले जाते . हिंदू धर्मातील नवरात्रांप्रमाणेच मानला जाणारा हा उत्सव, जैन धर्माचे मुख्य तत्व अहिंसेवर चालण्याचा मार्ग दर्शवतो. या उत्सवाच्या काळात जैन धर्मिय नागरीक संपूर्ण जगासाठी प्रार्थना करतात आणि आपल्याकडून झालेल्या चुकांबद्दल दिलगिरी व्यक्त करतात.