मुंबई मेट्रो 8 च्या कामाला लवकरच सुरूवात होणार असून राज्य सरकार लवकरात लवकर मेट्रो लाईनच्या कामाचे लोकार्पण करणार आहे. आजच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना जमीन अधिग्रहण प्रक्रियेसाठी निर्देश देखील दिले आहेत. येत्या सहा महिन्यांमध्ये मेट्रो लाईनसाठी लागणाऱ्या जमिनिचं अधिग्रहण करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या या मेट्रो मार्गाची एकूण लांबी 35 किलोमीटर असून भूमिगत मार्ग 9.25 किलोमीटर आहे. 24.636 किमीचा उन्नत मार्ग (Elevated) असून एकूण 20 स्थानके, 6 स्थानके भूमिगत, 14 स्थानके उन्नत असणार आहेत.
advertisement
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2 स्थानक ते घाटकोपर पूर्व पर्यंत भूमिगत स्थानके, घाटकोपर पश्चिम स्थानक ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2 स्थानकापर्यंत उन्नत स्थानके आहेत. दोन स्थानकांतील सरासरी अंतर 1.9 किलोमीटर असून 30.7 हेक्टर भूसंपादनाची आवश्यकता आहे. भूसंपादनासाठी 388 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी एकूण 22 हजार 862 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मेट्रो मार्गासाठी लागणाऱ्या जमिनिचे अधिग्रहण करावे, विविध मंजुरीचे कामे लवकर पूर्ण करावेत, पुढच्या तीन वर्षांमध्ये संपूर्ण प्रोजेक्ट पूर्ण करावा, काम सुरू करण्याआधीच सर्व परवानग्या मिळवा, असे निर्देश सुद्धा मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
