TRENDING:

मुंबईत आकडे फिरले,काँग्रेस किंगमेकरच्या भूमिकेत; कोण आहेत 20 धुरंदर ज्यांनी गेम पलटवला

Last Updated:

मुंबईत आकडे फिरल्यास काँग्रेस किंगमेकरच्या भूमिकेत येण्याची शक्यता आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निकालात मोठा ट्वीस्ट समोर आला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीचे कल अद्यापही स्पष्ट झाले नसल्याचे चित्र आहे. दुपारपर्यंत बहुमताचा कल गाठणाऱ्या महायुतीचा आकडा संध्याकाळपर्यंत कमी झाला. आकडे फिरल्यास काँग्रेस किंगमेकरच्या भूमिकेत येण्याची शक्यता आहे. इतर पक्ष एकत्र आल्यास सत्तेचे समीकरण बदलू शकते का, याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
News18
News18
advertisement

मुंबईत सत्ता स्थापन करण्यासाठी 114 चा जादूई आकडा आहे. मुंबई महानगरपालिकेच्या हाती आलेल्या आकड्यानुसार सध्या भाजप आणि शिंदेंच्या युतीला 110 जागा मिळाल्या असून ठाकरे बंधू 72 जागांवर आहे. तर काँग्रेस 23 जागांवर असून इतर जागांवर 10 नगरसेवक आहे.या इतरमध्ये एमआयएमचे 8 नगरसेवक आहेत. यामुळे मुंबईत चित्र बदलण्याची शक्यता आहे.

विधानसभा क्षेत्र (AC) विजयी पक्ष वॉर्ड क्र. नगरसेवकाचे नाव (INC)
कांदिवली (पूर्व) INC 28 डॉ. अजंता यादव
मालाड पश्चिम INC 33 कमरजहाँ मोहंमद मोईन सिद्दीकी
मालाड पश्चिम INC 34 हैदर अस्लम शेख
मालाड पश्चिम INC 48 रफिक इलियास शेख
मालाड पश्चिम INC 49 संगीता कोळी
वर्सोवा INC 61 दिव्या अवनीश सिंग
अंधेरी पश्चिम INC 66 मेहेर मोहसीन हैदर
कलिना INC 90 ॲड. ट्युलिप मिरांडा
वांद्रे पूर्व INC 92 मोहंमद इब्राहिम मोहंमद इक्बाल कुरेशी
चेंबूर INC 150 वैशाली अजित शेडकर
कलिना INC 165 मोहंमद अशरफ आझमी
कलिना INC 167 डॉ. समन अर्शद आझमी
शीव (सायन) INC 179 आयशा सुफियान वानू
धारावी INC 183 आशा दीपक काळे
धारावी INC 184 साजिदा बी बब्बू खान
भायखळा INC 211 खान मोहंमद वकूर नासिर अहमद
मुंबादेवी INC 213 नसीमा जावेद जुनेजा
मुंबादेवी INC 216 राजश्री महेश भाटणकर
मुंबादेवी INC 223 ज्ञानराज यशवंत निकम

advertisement

मुंबई महानगरपालिकेच्या मतमोजणीत संध्याकाळपर्यंत चित्र पूर्णपणे बदलताना दिसत आहे. सकाळच्या सत्रात एकतर्फी वाटणारी ही लढत आता थेट अटीतटीमध्ये रूपांतरित झाली आहे. महायुतीने (भाजप–शिंदे गट) बहुमताचा आकडा गाठल्याचा दावा केला असला, तरी अनेक महत्त्वाच्या वॉर्डांमध्ये ठाकरे गट आणि मनसेने दिलेल्या कडव्या झुंजीमुळे महायुतीच्या गोटात धाकधूक वाढली आहे. दुपारी भाजपकडून विजयाच्या जल्लोषासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला, मात्र मुंबई महापालिकेच्या विजयावर आक्रमक दावा करण्याऐवजी सावध भूमिका घेतल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले. त्यामुळे राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.

advertisement

हे ही वाचा :

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पारंपरिक शेतीला दिला फाटा, केली खरबूज लागवड, शेतकऱ्याची लाखांत कमाई, Video
सर्व पहा

मुंबई ठाकरेंच्या हातातून निसटली, पालिकेवर भाजपची सत्ता; 227 विजयी नगरसेवकांची यादी

Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईत आकडे फिरले,काँग्रेस किंगमेकरच्या भूमिकेत; कोण आहेत 20 धुरंदर ज्यांनी गेम पलटवला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल