TRENDING:

देशात सायबर गुन्हेगारीत वाढ मुंबई तिसऱ्या क्रमांकावर, महाराष्ट्रात वृद्ध असुरक्षितच; एनसीआरबीच्या अहवालातून स्पष्ट

Last Updated:

महाराष्ट्रामध्ये वृद्ध असुरक्षित असल्याचा अहवाल नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरो (एनसीआरबी)ने दिलेला आहे. एनसीआरबीने दिलेल्या अहवालानुसार ज्येष्ठ नागरीकांवरील अत्याचारांमध्ये महाराष्ट्र टॉप 5 च्या यादीमध्ये अव्वल स्थानी आहे. एनसीआरबीचा हा अहवाल सहाजिकच धडकी भरवणारा आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
महाराष्ट्रामध्ये वृद्ध असुरक्षित असल्याचा अहवाल नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरो (एनसीआरबी)ने दिलेला आहे. एनसीआरबीने दिलेल्या अहवालानुसार ज्येष्ठ नागरीकांवरील अत्याचारांमध्ये महाराष्ट्र टॉप 5 च्या यादीमध्ये अव्वल स्थानी आहे. एनसीआरबीचा हा अहवाल सहाजिकच धडकी भरवणारा आहे. महाराष्ट्रामध्ये अनेकदा वृद्धांवरील अत्याचारांच्या बातम्या येत असतात. त्याच आधारावरील आता हा अहवाल समोर आला आहे. एनसीआरबीने देशातील 19 प्रमुख शहरांमधील गुन्हेगारीचा आढावा घेतला असून त्यामध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे.
योजना 
योजना 
advertisement

देशामध्ये सायबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. 2022 च्या तुलनेमध्ये 2023 साली सायबर गुन्हेगारीमध्ये तब्बल 31 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सायबर गुन्हेगारीचा हा आकडा 2022 साली 65, 983 इतका आकडा होता. आता 2023 साली हाच आकडा तब्बल 21,000 ने वाढला आहे. 2023 मध्ये हा आकडा थेट 86,420 वर पोहोचला. 2022 साली प्रति लाख लोकसंख्येमागे 4.8 टक्के इतका गुन्हेगारीचा दर होता, परंतू 2023 साली समोर आलेल्या ह्या आकड्या प्रमाणे 6.2 इतका गुन्हेगारीचा दर समोर आला आहे. देशामध्ये होत असलेल्या गुन्हेगारीच्या तुलनेत सायबर गुन्हेगारीचे प्रमाण जास्त आहे. इतरत्र गुन्हेगारीच्या तुलनेत 68.9 टक्के इतके सायबर गुन्ह्याचे प्रमाण आहे.

advertisement

पनवेलमध्ये छमछमवर छापेमारी, 20 जणांना ठोकल्या बेड्या

सायबर गुन्हेगारीमध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारे नागरिकांना फसवण्यात आले आहे. एकूण नोंद झालेल्या गुन्ह्यांपैकी 59,526 प्रकरणे फसवणुकीची आहेत. सायबर गुन्हेगार नागरिकांना मोठ्या प्रमाणावर लोकांना फसवतात. याशिवाय, 4,199 प्रकरणे लैंगिक शोषणाची नोंद आहेत. खंडणी वसूल करण्याचे 3,326 गुन्हे घडले आहेत. राग आणि वैयक्तिक सूड घेण्यासाठी 2,228 सायबर गुन्हे झाले. राजकीय हेतूने 205 गुन्हे घडले. समाजमाध्यमांवर फेक न्यूज पसरवण्याच्या देशात 209 घटना नोंदल्या गेल्या. यापैकी 98 प्रकरणे एकट्या तेलंगणमध्ये होती. पद्दुचेरीमध्ये 147 गुन्हे नोंदवले गेले आहेत.. तर मिझोराममध्ये 31 गुन्हे नोंदवले गेले आहेत.

advertisement

या सर्व गुन्ह्यांमध्ये वृद्ध व्यक्ती सॉफ्ट टार्गेट ठरताना दिसत आहेत. महाराष्ट्रामध्ये मुंबई, नागपूर आणि पुणे या शहरांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण सर्वाधिक आहे. 2021 आणि 2022 च्या तुलनेमध्ये 2023 मधील आकडा फार कमी आहे. पण तरी देखील एनसीआरबीच्या क्रमवारीमध्ये मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे. 2021 मध्ये मुंबईत 987 गुन्ह्यांची नोंद आणि 2022 मध्ये हाच आकडा 572 वर आला होता. तर 2023 मध्ये 518 इतक्या गुन्ह्यांची नोंद पोलिस दप्तरी झाली आहे. तर, देशामध्ये, पहिल्या क्रमांकावर दिल्ली 1361 आणि दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक बंगळुरू 649 इतक्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

advertisement

KBC च्या मंचावर महाराष्ट्राच्या शेतऱ्याची कमाल, कैलास कुंटेवाडचे बिग बी फॅन...

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुण्यात इथं मिळते प्रसिद्ध लेमन टी, चव अशी की एकदा प्याल तर पुन्हा याल
सर्व पहा

तर, मुंबई तिसऱ्या क्रमांकावर असून मुंबईमध्ये 5 हत्यांची नोंद झाली आहे. मुंबईमध्ये घरात एकट्या असलेल्या वृद्धांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. घरात एकट्या असलेल्या वृद्धांना गृहपयोगी वस्तूंपासून, रेशनिंग, गॅस लाइटबिल आणि औषधं आणून देण्यासाठी पोलिस पुढाकार घेतात. यामुळे त्यांच्यातील नाळ अधिक घट्ट होताना दिसत आहे. मुंबईत एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, वृद्ध आजी- आजोबांची माहिती पोलि‍सांकडे नोंद आहे. प्रत्येक पोलिस ठाण्यांतर्गत ज्येष्ठ नागरिकांच्या भेटीगाठीसह त्यांच्या प्रत्येक कॉलला मुंबई पोलिस मदतीसाठी धावून जात आहेत.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
देशात सायबर गुन्हेगारीत वाढ मुंबई तिसऱ्या क्रमांकावर, महाराष्ट्रात वृद्ध असुरक्षितच; एनसीआरबीच्या अहवालातून स्पष्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल