TRENDING:

अमेरिकन महिला भारतात आली, ‘त्या’ ट्वीटनं मुंबई पोलीस अलर्ट, तपासाची चक्रे फिरली अन् धक्कादायक कांड समोर

Last Updated:

Mumbai News: मुंबईत परदेशी महिलांच्या फसवणुकीच्या 2 घटना एका आठवड्यात उघड झाल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताच एका अमेरिकी महिलेची आर्थिक फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. संबंधित महिलेने हा अनुभव थेट मुंबई पोलिसांच्या एक्स (X) हँडलवर पोस्ट केला असून त्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली. अनेक नेटकऱ्यांनी यावर व्यंगात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या, मात्र या महिलेने अत्यंत सकारात्मक भूमिका घेत भारत आणि भारतीयांविषयीचे आपले प्रेम कायम असल्याचे स्पष्ट केले.
अमेरिकन महिला भारतात आली, ‘त्या’ ट्वीटनं मुंबई पोलीस अलर्ट, तपासाची चक्रे फिरली अन् धक्कादायक कांड समोर
अमेरिकन महिला भारतात आली, ‘त्या’ ट्वीटनं मुंबई पोलीस अलर्ट, तपासाची चक्रे फिरली अन् धक्कादायक कांड समोर
advertisement

अर्जेंटिना अरियानो या अमेरिकी नागरिक महिला 12 जानेवारी रोजी एका लग्नसोहळ्यासाठी भारतात आल्या होत्या. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून त्यांना जवळच असलेल्या हिल्टन टॉवर्स हॉटेल येथे जायचे होते. विमानतळ परिसरात उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने त्यांना टॅक्सी उपलब्ध करून दिली. मात्र अवघ्या 400 मीटर अंतरासाठी टॅक्सीचालकाने तब्बल 200 डॉलर इतके भाडे आकारल्याने त्या चकित झाल्या.

advertisement

70 वर्षाचं वासनांध म्हातारं, शाळेला जाणाऱ्या चिमुकलीला घरी बोलावलं अन्..., बीड हादरलं!

हा अनुभव अर्जेंटिना अरियानो यांनी एक्सवर पोस्ट करत मांडला. पोस्टसोबत त्यांनी संबंधित टॅक्सीचा रजिस्ट्रेशन नंबर असलेले छायाचित्रही जोडले. या घटनेनंतर काही नेटकऱ्यांनी भारताविरोधात टीका करत टोमणे मारले. त्यावर उत्तर देताना अर्जेंटिना म्हणाल्या, “भारतीय लोक दयाळू आणि काळजी घेणारे आहेत. त्यांचा स्वभाव आणि खाद्यसंस्कृती मला खूप आवडते. केवळ दोन भामट्यांमुळे संपूर्ण देश आणि भारतीयांबद्दल मत बनवणे चुकीचे आहे. भारत खूप सुंदर आहे.”

advertisement

पोलिसांची तातडीची कारवाई

अर्जेंटिना यांच्या एक्स पोस्टची दखल घेत मुंबई पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. टॅक्सीच्या नोंदणी क्रमांकाच्या आधारे शोधमोहीम राबवण्यात आली. सहार पोलिसांनी पोस्टमधील छायाचित्र विमानतळ परिसरातील टॅक्सी व रिक्षाचालकांमध्ये प्रसारित केले. त्यानंतर पप्पू यादव नावाचा आरोपी पोलिसांच्या ताब्यात आला. दुसरा आरोपी तौफिक शेख सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

advertisement

आठवड्यातील दुसरी घटना

मुंबईत परदेशी महिलांच्या फसवणुकीच्या 2 घटना एका आठवड्यात उघड झाल्या आहेत. अर्जेंटिना अरियानो यांच्याशिवाय व्यवसायानिमित्त भारतात आलेल्या सुमय्या अब्दी (27) या केनियन नागरिक महिलेला पोलिस असल्याचे भासवून 2 तोतयांनी लुटले. त्यांच्या जवळील 66 लाख रुपयांची रोकड घेऊन आरोपी पसार झाले होते. यापैकी 1 आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले. ही घटना 27 जानेवारी रोजी फोर्ट परिसरात घडली होती.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याच्या दरात घट, सोयाबीन आणि कापसाला आज काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

या घटनांमुळे परदेशी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून मुंबई पोलिसांकडून अधिक कडक उपाययोजना राबवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
अमेरिकन महिला भारतात आली, ‘त्या’ ट्वीटनं मुंबई पोलीस अलर्ट, तपासाची चक्रे फिरली अन् धक्कादायक कांड समोर
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल