राज्यातील परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच राज्य परिवहन प्राधिकरणाची बैठक झाली. या बैठकीत एसटी बसच्या तिकीट दरवाढीला मंजुरी देण्यात आली. मात्र, सुधारित तिकीट दर केव्हा लागू होतील, याबाबत अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबईकरांसाठी खूशखबर! बदलापूर, डोंबिवली ते मुंबई आता थेट प्रवास, लवकरच नवा मार्ग
advertisement
दरम्यान, राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व विभागांना 100 दिवसांचे नियोजन करून सादरीकरण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार एसटी महामंडळाने काही सूचना केल्या होत्या. यात स्वमालकीच्या 5 हजार नव्या बस खरेदी करणे, पहिल्या चार महिन्यात 20 चार्जिंग स्टेशन कार्यान्वित करणे आणि तिकीट दरात 14.95 टक्के भाडेवाढ करणे अशा प्रमुख मुद्द्यांचा समावेश होता. त्यानुसार आता प्रस्तावित भाडेवाढ करण्याबाबत निर्णय झाला आहे.
एसटीची 14.95 टक्के भाडेवाढ
एसटीने विधानसभा निवडणुकांच्या पूर्वी सादर केलेल्या प्रस्तावात सरसकट 18 टक्के भाडेवाढ प्रस्तावित होती. मात्र, आता त्यात सुधारणा करण्यात आल्या असून 14.95 टक्के दरवाढीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. निवडणूक काळात हा प्रस्ताव थांबवण्यात आला होता. परंतु, आता एसटीच्या संचालक मंडळाने या दरवाढीस मंजुरी दिली आहे.