मुंबईकरांसाठी खूशखबर! बदलापूर, डोंबिवली ते मुंबई आता थेट प्रवास, लवकरच नवा मार्ग
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Mumbai News: बदलापूर, डोंबिवलीकरांना आता थेट रस्ते मार्गाने मुंबईत जाता येणार आहे. लवकरच नव्या द्रुतगती मार्गाची निर्मिती करण्यात येणार आहे.
मुंबई: वाहतूककोंडीने त्रस्त मुंबईकरांसाठी खूशखबर आहे. कल्याण-डोंबिवलीसह कल्याणच्या पलीकडील नागरिकांना मुंबई व नवी मुंबईशी थेट जोडले जाणार आहे. लवकरच विना अडथळा नव्या द्रुतगती मार्गाची निर्मिती करण्यात येणार आहे. मुंबई महानिगर विकास प्राधिकरण म्णजेच एमएमआरडीएने या मार्गाचा आराखडा बनवण्यास सुरुवात केलीये.
महामुंबई प्रदेशातील 6 हजार चौरस किमीहून अधिक भागात एमएमआरडीए विकास कामे करत आहे. त्यात जवळपास 12 मेट्रो मार्गिका, दोन सागरी सेतू, 3 कनेक्टर, विविध जोडमार्ग, उड्डाणपूल आदींचा समावेश आहे. मात्र, त्या भागातून मुंबईत येणाऱ्यांसाठी लोकलशिवाय दुसरा पर्याय नाही. यासाठीच एमएमआरडीएकडून थेट मार्गाची निर्मिती केली जाणार आहे.
advertisement
या द्रुतगती मार्गाचा बृहत् प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्यासाठी एमएमआरडीएने निविदा काढली आहे. त्यानुसार बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण व डोंबिवली ते मुंबई आणि नवी मुंबई असा मर्यादित प्रवेशांचा विनाअडथळा मार्ग उभारण्यात येणार आहे. हा मार्ग द्रुतगती स्वरुपाचा असून तो राष्ट्रीय मार्ग दर्जाचा असावा, असे निश्चित करण्यात आले आहे. मात्र, तो किती पदरी असावा याबाबत डीपीआर तयार करणाऱ्या संबंधित कंत्राटदारालाच निश्चित करायचे आहे.
advertisement
दरम्यान, याबाबत विविध प्रकारचा अभ्यास, भूसंपादनाची आवश्यकता, सर्वेक्षण हे संबंदित कंत्राटदारांनाच करावे लागेल. तसेच कंत्राट मिळाल्यापासून 8 महिन्यांत डीपीआर तयार करायचा असल्याचे निविदेत नमूद केले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 24, 2025 8:37 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईकरांसाठी खूशखबर! बदलापूर, डोंबिवली ते मुंबई आता थेट प्रवास, लवकरच नवा मार्ग