भयानक गुन्ह्याचे 16 वर्षांनी उलगडलेले सत्य
2009 साली अल्पवयीन असताना एका मूकबधिर पीडितेला ड्रग्ज देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. पण तिच्या सोबत घडलेला हा प्रकार भीती आणि धमक्यांमुळे ती वर्षानुवर्षे गप्प राहिली होती. मात्र अलीकडेच आणखी एका मूकबधिर महिलेने पवारच्या अत्याचारांमुळे नैराश्यात जाऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली. या घटनेने पहिली पीडित हादरली आणि तिने न्यायासाठी पुढे येण्याचा धाडसी निर्णय घेतला.
advertisement
पीडितेने व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉलद्वारे सांकेतिक भाषेत तिच्या सोबत घडलेला प्रसंग मित्रांना सांगितला. त्यानंतर तिने पतीलाही सर्व सांगितले. ठाणे डेफ असोसिएशन, सामाजिक कार्यकर्ते, सांकेतिक भाषेचे दुभाषी आणि तज्ज्ञांच्या मदतीने पीडिता थेट पोलिसांपर्यंत पोहोचली. कुरार पोलिस ठाण्यात तिचे जबाब कॅमेऱ्यात नोंदवण्यात आले.
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार महेश पवारने अशाच प्रकारे अनेक मूकबधिर महिलांना लक्ष्य करत ड्रग्ज देऊन लैंगिक शोषण केले होते. अखेर 13 डिसेंबर रोजी पोलिसांनी त्याला अटक केली. हा प्रकार केवळ गुन्हा नसून व्यवस्थेच्या दुर्लक्षावर आणि समाजाच्या असंवेदनशीलतेवर असलेला काळा डाग आहे.
