TRENDING:

मुंबईकरांचा वेळ वाचणार, पण कधी? वाकोला-बीकेसी उन्नत मार्गाबाबत महत्त्वाचं अपडेट

Last Updated:

Mumbai News: सध्या सांताक्रूझ ते बीकेसी या अंतरासाठी साधारण 30 ते 35 मिनिटे लागतात. मात्र हा उन्नत मार्ग सुरू झाल्यानंतर हा प्रवास फक्त 5 ते 10 मिनिटांत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अनेक रस्ते आणि उड्डाणपूल प्रकल्प सुरू आहेत. त्यापैकी सांताक्रूझ–चेंबूर लिंक रोड (एससीएलआर) च्या विस्ताराचा भाग असलेला वाकोला ते वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) उन्नत मार्ग हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प मानला जात आहे. हा मार्ग मार्च महिन्याच्या अखेरीस सुरू होईल, असे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) यापूर्वी सांगितले होते. मात्र काही तांत्रिक कामे अद्याप बाकी असल्यामुळे हा मार्ग सुरू होण्यास आणखी थोडा वेळ लागणार आहे.
मुंबईकरांचा वेळ वाचणार, पण कधी? वाकोला-बीकेसी उन्नत मार्गाबाबत मोठं अपडेट
मुंबईकरांचा वेळ वाचणार, पण कधी? वाकोला-बीकेसी उन्नत मार्गाबाबत मोठं अपडेट
advertisement

एमएमआरडीएने दिलेल्या माहितीनुसार, वाकोला परिसरात पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळील पुलावरचा एक महत्त्वाचा गर्डर बसवण्याचे काम अद्याप बाकी आहे. त्या भागातील रस्ता वळणदार असल्यामुळे हे काम काळजीपूर्वक करावे लागत आहे. त्यामुळे वाहतुकीचा तात्पुरता ब्लॉक घेऊन हे काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या कारणामुळेच प्रकल्पाचे काम एप्रिल महिन्यापर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे.

advertisement

Thane News: ठाण्यामध्ये गुढीपाडव्याच्या स्वागत यात्रेनिमित्त वाहतुकीत बदल, कसा असेल मार्ग?

प्रकल्पाची माहिती

View More

वाकोला ते बीकेसी दरम्यान सुमारे 1.2 किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग तयार केला जात आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे 645 कोटी रुपयांचा खर्च होत आहे. या मार्गावर दोन्ही बाजूंना दोन-दोन लेन असतील. हा मार्ग वाकोला जंक्शन, आंबेडकर चौक, युनिव्हर्सिटी जंक्शन आणि बीकेसी जंक्शन या महत्त्वाच्या ठिकाणांना जोडणार आहे. त्यामुळे या परिसरात ये-जा करणाऱ्या वाहनांसाठी एक नवीन आणि सोयीचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

advertisement

प्रवासाचा वेळ कमी होणार

सध्या सांताक्रूझ ते बीकेसी या अंतरासाठी साधारण 30 ते 35 मिनिटे लागतात. मात्र हा उन्नत मार्ग सुरू झाल्यानंतर हा प्रवास फक्त 5 ते 10 मिनिटांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या मार्गावर तीन सिग्नल नसतील, त्यामुळे वाहनांची हालचाल अधिक वेगाने आणि सुरळीत होऊ शकणार आहे. त्यामुळे या भागातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होईल.

advertisement

पूर्व आणि पश्चिम उपनगरांना मिळणार नवा पर्याय

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दोनदा अपयश पण जिद्द नाही सोडली, पुण्याच्या आर्याने कंपनी सेक्रेटरी परीक्षेत मिळवलं यश, Video
सर्व पहा

या प्रकल्पामुळे वाकोला, आंबेडकर चौक, युनिव्हर्सिटी परिसर आणि बीकेसी या महत्त्वाच्या भागांमध्ये जाणे सोपे होणार आहे. तसेच पश्चिम द्रुतगती महामार्गावरून दहिसरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांनाही या मार्गाची जोडणी मिळणार आहे. त्यामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांदरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी हा मार्ग एक महत्त्वाचा पर्याय ठरणार आहे आणि प्रवाशांचा वेळही मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईकरांचा वेळ वाचणार, पण कधी? वाकोला-बीकेसी उन्नत मार्गाबाबत महत्त्वाचं अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल