नेमकं काय घडलं?
सोशल मीडियावरून पसरलेल्या अफवांचा किती गंभीर परिणाम होऊ शकतो, याचा धक्कादायक अनुभव मालवणी परिसरात पुन्हा एकदा आला आहे. काही दिवसांपूर्वी संबंधित महिलेचे तिच्या प्रियकराशी ब्रेकअप झाले होते. पुन्हा एकदा त्याच्याशी संवाद साधून गैरसमज दूर करण्याच्या उद्देशाने ती त्याच्या घराजवळ गेली होती. मनधरणीसाठी ती केक घेऊन आली होती. मात्र प्रियकर घरी नसल्याचे लक्षात आल्यानंतर तिने तो केक परिसरात खेळणाऱ्या लहान मुलांना दिला आणि तेथून निघून गेली.
advertisement
Kalyan Crime: सूनेच्या रक्ताचा एक थेंब अन् सासूचं कृत्य उघड, सिनेमाला लाजवेल अशा कल्याणमध्ये घटना
संशयातून मारहाण
प्रियकर घरी परतला असावा, या आशेने महिला पुन्हा त्या परिसरात आली. यावेळी आधी मुलांना केक दिलेली तीच महिला पुन्हा दिसल्याने काही नागरिकांच्या मनात संशय निर्माण झाला. सोशल मीडियावर पसरलेल्या ‘मुले चोर’ अफवांचा प्रभाव इतका होता की, कोणतीही खात्री न करता जमावाने तिला घेरले. चौकशीच्या नावाखाली तिच्यावर हात उचलण्यात आला आणि तिला मारहाण करण्यात आली.
पोलिसांची तत्काळ कारवाई
घटनेची माहिती मिळताच मालवणी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. महिलेला जमावाच्या तावडीतून सोडवून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. कसून चौकशीनंतर ती महिला मुले चोरणारी नसून संपूर्ण प्रकार हा गैरसमजामुळे घडल्याचे स्पष्ट झाले.
परिसरात भीतीचे वातावरण
या घटनेनंतर मालवणी परिसरात काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या या भागात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या पार्श्वभूमीवर मालवणी पोलिसांनी नागरिकांना स्पष्ट आवाहन केले आहे की, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, कायदा हातात घेऊ नका. संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू आढळल्यास स्वतः निर्णय न घेता त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा.






