नुकतेच महाराष्ट्र विधिमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीने सिडको कार्यालयाला भेट दिली. आमदार ॲप. राहुल कुल यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत 26 सदस्यांचा समावेश होता. यावेळी समितीने विविध प्रकल्पांचा आढावा घेतला. नवी मुंबई विमानतळ प्रकल्पात संयुक्त भागीदारी असलेल्या सिडको आणि अदानी समूहाने या समितीसमोर सादरीकरण केले. यावेळी सिडकोचा वार्षिक अहवाल, आर्थिक विवरण, संचालन आणि महालेखापरीक्षकांच्या अहवालातील आक्षेपांवर देखील चर्चा केल्याचेही सूत्रांनी सांगितले.
advertisement
मुंबईकरांना मिळणार स्वस्तात वीज, महावितरणचा मोठा निर्णय, टाटा, अदानीला देणार टक्कर
या प्रकल्पांची घेतली माहिती
सार्वजनिक उपक्रम समितीने सिडकोच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची माहिती घेतली. यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह, नैना प्रकल्प, पंतप्रधान आवास योजना तसेच इतर पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांचा देखील समावेश होता. तसेच यावेळी समितीने विमानतळाच्या टर्मिनल आणि धावपट्टीसह एकंदर कामाचा आढावा घेतला. यावेळी विमानतळाचे लोकार्पण ऑगस्टऐवजी सप्टेंबर अखेरीस होईल, असे अदानी समूहाने सांगितल्याचे सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
