मुंबईकरांना मिळणार स्वस्तात वीज, महावितरणचा मोठा निर्णय, टाटा, अदानीला देणार टक्कर

Last Updated:

Mahavitaran: मुंबईकरांसाठी फायद्याची बातमी आहे. आता महावितरण मुंबईत वीज वितरण करणार असून स्वस्तात वीज मिळणार आहे.

मुंबईकरांना मिळणार स्वस्तात वीज, महावितरणचा मोठा निर्णय, टाटा, अदानीला देणार टक्कर
मुंबईकरांना मिळणार स्वस्तात वीज, महावितरणचा मोठा निर्णय, टाटा, अदानीला देणार टक्कर
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगर परिसरात बेस्ट, टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटीकडून वीज पुरवठा केला जातो. आता या स्पर्धेत महावितरण देखील उतरले आहे. त्यामुळे महावितरण मुंबईकरांना स्वस्तात वीज देण्याच्या प्रयत्नात आहे. नुकतेच महावितरणने वीज नियामक आयोगाकडे मुंबईत वीज पुरवठा करण्याचा परवाना मागितला आहे. तसेच बेस्ट, टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटीच्या तुलनेत स्वस्त दराने वीज देऊ, असा दावा महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांनी केला आहे.
मुंबईत वीज वितरणाचे जाळे नसल्याने वीज पुरवठा करण्यासाठी पायाभूत सुविधा उभाराव्या लागणार आहेत. महावितरणपुढे याच पायाभूत सोयी-सुविधा उभारण्याचं आव्हान असणार आहे. वीज नियामक आयोगाने वीजदर निश्चितीच्या प्रस्तावावर निर्णय देताना वीज दर कपातीचे आदेश दिले. याबाबत महावितरणच्या मुख्यालयात अध्यक्ष लोकेश चंद्र यांनी पत्रकार परिषदेतून माहिती दिली.
advertisement
एकाच दराने वीज
राज्यात आणि मुंबईत महावितरणच्या विजेचे दर समान असणार आहेत. राज्यात एका दराने वीज आणि मुंबई दुसऱ्या दराने असे होणार नाही. मुंबईसाठी स्वतंत्र कंपनी नसेल. तरीही येथील वीज कंपन्यांचे ग्राहक आपल्याकडे वळते करण्याचे आव्हान असणार असल्याचे चंद्र यांनी सांगितले.
या क्षेत्रांसाठी मागितली परवानगी
सध्या मुंबईच्या पूर्व उपनगरात भांडूप आणि मुलुंड परिसरात महावितरण विजेचा पुरवठा करत आहे. आता महावितरणने कुलाबा ते माहीम, पश्चिम उपनगरांतील वांद्रे ते दहिसर, पूर्व उपनगरात विक्रोळी ते चुनाभट्टी आणि मानखुर्द तसेच चेना व काजुपाडासह मीरा-भाईंदर क्षेत्रात परवाना मिळावा, अशी मागणी आयोगाकडे केली आहे. आता उर्वरित शहर आणि परिसरात महावितरण वीज वितरणाच्या तयारीत आहे. त्यामुळे चार कंपन्यांत स्पर्धा होणार आहे.
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईकरांना मिळणार स्वस्तात वीज, महावितरणचा मोठा निर्णय, टाटा, अदानीला देणार टक्कर
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement