IND vs AUS : गंभीरने ज्याच्यासाठी केला अट्टाहास, त्यानेच दिला दगा, सगळ्यात मोठा 'मॅचविनर' खेळाडू ठरला विलन

Last Updated:

टीम इंडियाचा मुख्य कोच गौतम गंभीरने ज्या खेळाडूवर सर्वांत जास्त विश्वास दाखवला, त्याच खेळाडूने त्याला मोठा धोका दिला आहे.त्यामुळे तो खेळाडू या मालिकेचा विलन ठरला आहे.

IND vs AUS
IND vs AUS
India vs Australia : ऑस्ट्रेलिया विरूद्धचा तिसरा वनडे सामना भारताने 9 विकेटसने जिंकला आहे.भारताच्या या विजयात रोहित शर्माने नाबाद 120 धावांची आणि विराट कोहलीने 69 धावांची नाबाद खेळी करून मोलाची भूमिका बजावली.हा सामना भारताने जिंकून ऑस्ट्रेलियाच्या हातून व्हाईटवॉश होण्यापासून स्वत:चा बचाव केला आहे.अशाप्रकारे ही मालिका 2-1ने सुटली. या मालिकेत टीम इंडियाचा मुख्य कोच गौतम गंभीरने ज्या खेळाडूवर सर्वांत जास्त विश्वास दाखवला, त्याच खेळाडूने त्याला मोठा धोका दिला आहे.त्यामुळे तो खेळाडू या मालिकेचा विलन ठरला आहे. हा खेळाडू नेमका कोण आहे? हे जाणून घेऊयात.
खरं तर हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून तोच आहे, ज्याच्यावर गंभीर सर्वात जास्त विश्वास ठेवतो. गंभीर त्याला भारताचा भविष्यातला कर्णधार म्हणूनही पाहतो. यासाठी रोहित शर्मासारख्या दिग्गज खेळाडूकडून कर्णधार पद काढून घेण्यात आलं आणि युवा खेळाडूच्या खांद्यावर नेतृत्वारी जबाबदारी देण्यात आलं. रोहितला कर्णधारपद हवं होतं आणि त्याला त्याच्याच नेतृत्वात भारताला 2027चा वर्ल्ड कप जिंकून द्यायचा होता. हे त्याच स्वप्न होतं. पण गंभीरच्या हट्टापायी कर्णधार पद काढून घेण्यात आलं होतं आणि ते युवा खेळाडूच्या खांद्यावर देण्यात आलं.इथे मी तुम्हाला मी सांगतो हा खेळाडू टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल आहे.
advertisement
रोहित शर्मा वनडेच कर्णधार पद सांभाळण्यास तयार असताना देखील त्याच्याकडून ते काढून घेण्यात आलं आणि गिलच्या खांद्यावर देण्यात आलं. गिलच्या खांद्यावर ही जबाबदारी पडताच त्यांनी नेमके काय दिवे लावले, हे तुम्ही ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या वनडे मालिकेत पाहिलं देखील आहे.तरी आम्ही तुम्हाला सविस्तर सांगतो.
यशस्वी जयस्वालवर अन्याय
खरं तर शुभमन गिल या संपूर्ण मालिकेत फ्लॉप ठरला. पर्थमध्ये शुभमन गिलच्या बॅटीतून फक्त 10 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या वनडेतही तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला आणि अवघ्या 9 धावांवर बाद झाला. तिसऱ्या वनडेत शुभमन गिलने रोहित शर्मासोबत डावाची चांगली सूरूवात केली. पण पुन्हा तेच मोठ्या धावा करताना अपयशी ठरला आणि तो अवघ्या 24 धावांवर अपयशी ठरला. त्यामुळे एकप्रकारे शुभमन गिलचे आकडे पाहता तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अपयशी ठरला. त्याच्या या कामगिरीमुळे यशस्वी जयस्वालवर ही अन्याय झाला. जयस्वाल ही एक चांगला सलामीवीर आहे. पण गिलला संधी देण्याच्या नादात यशस्वी जयस्वालसोबत अन्याय झाला आहे.
advertisement
कॅप्टन्सीतही नापास
ही झाली शुभमन गिलच्या फलंदाजीची गोष्ट.पण कॅप्टन्सीमध्ये तरी गिल पास झाला का?तर नाहीच म्हणावे लागेल.कारण तीन सामन्यांपैकी एकाच सामन्यात भारताला विजय मिळाला. बाकी दोनही सामने भारताने हारले होते. तसं बघायला गेलं तर गिलच्या नेतृत्वात ही पहिलीच मालिका होती. पण या मालिकेत तो कर्णधार म्हणून फारशी छाप पाडू शकला नाही.रोहित शर्मा आणि विराट कोहली त्याच्या मदतीला मैदानात होते. ते वेळोवेळी मैदानात त्याला सल्ला देत होते. पण तरी देखील गिल कर्णधार म्हणून काहीसा अपयशीच ठरला.
advertisement
सरतेशेवटी काय तर...गौतम गंभीरने ज्या शुभमन गिलसाठी रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेतलं, तोच कर्णधार म्हणुन अपयशी ठरला. तसेच गिलवर विश्वास दाखवून त्याला संधी दिली. पण तो सलामीवीर म्हणून फारशी कामगिरी करू शकला नाही. त्याच्यामुळे जयस्वालवर अन्याय झाला. त्यामुळे गौतम गंभीरने ज्या एका व्यक्तीसाठी इतकं सगळं करून देखील शेवटी त्याच खेळाडूने त्याला मोठा दगा दिला आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS : गंभीरने ज्याच्यासाठी केला अट्टाहास, त्यानेच दिला दगा, सगळ्यात मोठा 'मॅचविनर' खेळाडू ठरला विलन
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement