पनवेलमध्ये नेमकं काय घडलं?
पनवेलमध्ये समोर आलेल्या पोस्टातील गुंतवणुकीच्या या फसवणूक प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली आहे. ज्यात पोस्टाच्या नावाने नागरिकांना विश्वासात घेऊन तब्बल 95 लाखांचा गंडा घातल्याचे समोर आल्याने सर्वत्र धक्का बसला आहे. कामिनी पेडणेकर नावाच्या एका महिलेने पोस्टाच्या विविध बचत योजनांमध्ये जास्त परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत अनेकांकडून लाखो रुपये उकळले होते. मात्र ही तिची योजना पूर्णपणे बनावट असून कामिनी प्रत्यक्षात पोस्टाची एजंट नसल्याचे चौकशीत स्पष्ट झालेले आहे.
advertisement
प्रकार कसा आला उघडकीस?
मिळालेल्या माहितीनुसार, नवीन पनवेल सेक्टर 6 येथील रुचिरा कौशिक यांना कामिनीने पोस्टातील RD आणि MIS स्कीममध्ये गुंतवणूक केली तर जादा व्याज मिळेल असे सांगितले. त्यानंतर तिच्या गोड बोलण्याला भुलून रुचिरा यांनी तब्बल 15 लाखांची गुंतवणूक केली. इतकेच नव्हे तर कामिनीने त्यांचे पोस्टाचे पासबुक तसेच सही केलेल्या दोन कोऱ्या विड्रॉल स्लिप स्वतःजवळ ठेवल्या. काही दिवसांनंतर रुचिरां यांना संशय आला मग त्यांनी त्यानंतर त्यांनी थेट पोस्ट ऑफिसमध्ये चौकशी केली आणि तेव्हा समजले कामिनी पेडणेकरचा पोस्टाशी काहीही संबंधच नव्हता.
रुचिरा यांनी थेट खांदेश्वर पोलिसांत जात या संपूर्ण प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पोलिसांना या बाबत अधिक चौकशी सुरू केली आहे. धक्कादायक म्हणजे याच वेळी तिचे इतरही गुन्हे बाहेर यायला सुरुवात झाली. कामिनीने याआधीही एका व्यक्तीची 30 लाख तर दुसऱ्या महिलेची 8.5 लाख तर अशा अनेक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. ज्यात सर्व पीडितांनी तिच्यावर विश्वास ठेवून मोठ्या रकमा दिलेल्या होत्या.
