TRENDING:

Anjali Damania : अजितदादांच्या नेत्याची टीका अंजली दमानियांच्या जिव्हारी! सोशल मीडियावरुन केली मोठी मागणी

Last Updated:

Anjali Damania : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि अजित पवार गटाचे युवक अध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यात आरोप प्रत्यारोप होत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, (प्रशांत रामदास, प्रतिनिधी) : पुणे हिट अँड रन केस सध्या देशभर गाजत आहे. या प्रकरणात पोलीस अधिकारी निलंबित झाले असून ससून रूग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक झाली आहे. अशातच आरोपीला मदत केल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवार यांचा फोन जप्त करून त्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली होती. यावरुन अजित पवार गटाचे युवक काँग्रेस अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी टीका केली होती. ही टीका अंजली दमानिया यांच्या जिव्हारी लागली असून त्यांनी थेट अजित पवार यांनाच यावरुन प्रश्न विचारला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर दमानिया यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
News18
News18
advertisement

अंजली दमानिया यांचा संताप

आज प्रचंड राग आला आहे. तुमच्या पक्षातले सूरज चव्हाण इतक्या खालच्या पातळीचे स्टेटमेंट करतात? आज मला त्या सूरज चव्हाणने “रीचार्जवर काम करणारी बाई” म्हटले? मला? मी काय आहे, आणि किती सिद्धांतांवर जगते हे तुमच्यापेक्षा चांगलेच कोणालाच माहीत नसेल. ते तुम्ही त्यांना सांगा, मग त्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल. सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबरोबर ही भाषा? का? त्यांना राजकारणाबद्दल बोलू नये म्हणून? सध्या मर्यादा न पळणाऱ्या असल्या लोकांना तुम्ही असे बोलण्याची मुभा देता? मला यावर तुमची ताबडतोब प्रतिक्रिया आणि त्यांच्याकडून लिखित स्वरुपात माफी हवी आहे. असले थर्ड ग्रेड स्टेटमेंट्स आणि त्यांची मेंटालिटी त्यांनी त्यांच्या खिश्यात ठेवावी. मला इतर महिला राजकारण्यांची प्रतिक्रिया पण हवी आहे. कारण असली थर्ड ग्रेड भाषा राजकारणात पूर्ण पणे थांबलीच पाहिजे, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.

advertisement

advertisement

सूरज चव्हाण यांची टीका काय होती?

अंजली दमानिया यांनी केलेल्या मागणीवर राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अंजली दमानिया यांची नार्को टेस्ट करा. अंजली दमानिया कुणाच्या सांगण्यावरून ही मागणी करतात. त्या नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या नाहीत तर ही रिचार्जवर चालणारी बाई आहे, असे म्हणत सूरज चव्हाण यांनी हल्लाबोल केला आहे. तर दमानिया बाईंना सुपारी मिळाली की त्या मागे लागतात. त्यांचा सीडीआर सरकारने तपासावा अशी माझी सरकारकडे मागणी आहे. दमानिया कुणाच्या फायद्यासाठी आरोप करतात हे तपासलं पाहिजे? अशी शंकाही सूरज चव्हाण यांनी व्यक्त केली.

advertisement

वाचा - जितेंद्र आव्हाडांनी फाडला बाबासाहेबांचा फोटो, आंदोलन आलं अंगलट

सूरज चव्हाण यांची प्रतिक्रिया

अंजली दमानिया यांनी माझ्यावरती व्यक्तिगत आरोप केले होते. त्यावर मी प्रतिक्रिया दिली. त्यावरती अंजली या भडकल्या आहेत. मात्र, दमानिया यांचा बोलविता धनी कोण आहे? यासाठी आगामी तीन-चार दिवसात मी पत्रकार परिषदेतून खुलासा करणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष सुरत चव्हाण यांनी दिली आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Anjali Damania : अजितदादांच्या नेत्याची टीका अंजली दमानियांच्या जिव्हारी! सोशल मीडियावरुन केली मोठी मागणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल