मराठा समाजाची जुनी मागणी होती मराठवाड्यापुरत कुणबी नोंदी होत्या त्यांना आरक्षण द्याव हैदराबाद गॅझेट प्रमाणे तो निर्णय आमच्या सरकारने घेतलाय.जेव्हा जेव्हा मराठा समाजाने गुलाल उधळला तो फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या कालावधी मध्ये. मराठा समाजाने याची दखल घेतली पाहीजे. प्रत्येक मराठा समाजातील नागरीकांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले पाहिजेत असे मंत्री नितेश राणे यांनी म्हटले आहे.
advertisement
नितेश राणे पुढे म्हणाले, देवेंद्र फडणवीसांना तुम्ही टार्गेट केलात पण त्याच फडणवीस यांनी तुम्हाला न्याय दिला. मराठा समाजाला राणे समितीच्या अनुषंगाने जर कोणी आरक्षण दिल तर ते फडणवीस सरकारने दिले आहे. आज ओबीसी समाजाला न दुखवता मराठा समाजाला न्याय दिला. जातीच्या नावावर हिंदु समाजाला तोडण्याचे प्रयत्न होत होते ते फडणवीस यांनी थाबवून दाखवले त्यामुळे फडणवीस साहेबांचे आभार मानावे तेवढे थोडेच,असे देखील नितेश राणे यांनी म्हटलं
रोरो बोट सेवेलवर बोलताना नितेश राणे म्हणाले, आजचा दिवस कोकण वासीयांसाठी ऐतिहासिक. रोरो सेवेची आज यशस्वी चाचणी झाली आहे. उद्या ही बोट पुन्हा मुंबई कडे जाणार आहे. येत्या दोन दिवसांत रोरो सेवा पॅसेंजर ला घेऊन कोकणात येणार आहे. त्यामुळे रोजगार, व्यापार आणि पर्यटन यासर्वामध्ये कोकण आता गतीमान पद्धतीने पुढे जाईल व रोरो सेवा कोकणासाठी गेमचेंजेस ठरणार आहे, असाही दावा त्यांनी केला आहे.