ठाणे : निसर्गाच्या सानिध्यात राहणं, हे प्रत्येकाचंच स्वप्न असतं. पण अनेक जण कामानिमित्त मुंबईसारख्या शहरांमध्ये राहतात. त्यामुळे सगळ्यांनाच निसर्गासोबत राहणं शक्य होत नाही. यामुळेच हल्ली ज्यांना निसर्ग खूप आवडतो अशांसाठी होम गार्डनिंग हा पर्याय उपलब्ध झाला आहे. अनेकांना होम गार्डनिंग करायला खूप आवडतं. तुम्हालाही जर होमगार्ड आणि आवडत असेल आणि त्यासाठीच्या लागणाऱ्या वस्तू तुम्हाला खरेदी करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी ठाण्यामध्ये एक बेस्ट ऑप्शन आहे.
advertisement
ठाण्यातील तलाव पाळी जांभळी नाक्यापासून फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर असणारे लीफ अँड हर्बस हे दुकान होमगार्डनिंग साठी लागणाऱ्या वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे. इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या रोपट्यांपासून ते कुंड्यांपर्यंत सगळ्या वस्तू अगदी कमी किमतीत मिळतील. त्याचबरोबर इथे तुम्हाला झाडांना लागणारे प्रोटीन किंवा नैसर्गिक खतही इथे मिळतात. यामुळे आपल्या घरातील कुंडीतील रोपटे अगदी टवटवीत दिसते.
ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळेचे पुण्यात जोरदार स्वागत, दगडूशेठ गणपतीचेही घेतले दर्शन, म्हणाला…., VIDEO
या दुकानात तुम्हाला इको फ्रेंडली असणाऱ्या सिरॅमिक, टेराकोटा त्याचसोबत मातीच्या अँटिक कुंड्या सुद्धा या अँटिक कुंड्यांमध्ये तुम्हाला खूप व्हरायटी इथे उपलब्ध आहेत. यामध्ये कमळाची अँटिक कुंडी, कार्टून्सचे चेहरे असणाऱ्या कुंड्या, वेगवेगळे फेसेस असणाऱ्या कुंड्या, प्राण्यांचा आकार असणाऱ्या कुंड्या असे अनेक प्रकारच्या कुंड्या तुम्हाला या दुकानात मिळतील. यांची किंमत फक्त 200 रुपयांपासून सुरू होते. इथे तुम्हाला तुमच्या इनडोअर प्लांट्सवर ठेवण्यासाठी छोट्या छोट्या अँटीक वस्तू सुद्धा मिळतील. यामुळे तुमची इनडोअर प्लांट्स आणखी खुलून दिसतील.
इथे मिळणार निमार्क गोल्ड हे नैसर्गिक औषध तुमच्या इनडोअर प्लांटवर जर किडे किंवा इतर गोष्टींची लागण होत असेल तर त्यांच्यापासून तुमच्या झाडांचे रक्षण करते. त्यासोबतच पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने बनवलेले बूस्टर संजीवनी हे खतसुद्धा तुमच्या झाडांची उंची वाढवण्यास मदत करतात.
'माझ्या दुकानात मिळणारे सगळ्या वस्तू या निसर्गाशी निगडितच आहेत. सगळ्या कुंड्या मातीच्या आहेत, त्यामुळे निसर्गाला यामुळे कोणतीही हानी पोहोचणार नाही. तुम्हाला ज्या पद्धतीने तुमचे घर डेकोरेट करायचे असेल त्या सगळ्या पद्धतीचे सामान माझ्या दुकानात मिळते,' असे दुकानदार महेंद्र गाडा यांनी सांगितले.
तुम्हालाही अँटिक वस्तूंनी तुमच्या घरातील गार्डनला अधिक सुंदर लूक द्यायचा असेल तर नक्की ठाण्यातील या लीफ अँड हर्बस या दुकानाला भेट द्या.





