ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळेचे पुण्यात जोरदार स्वागत, दगडूशेठ गणपतीचेही घेतले दर्शन, म्हणाला...., VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर एअर रायफल शूटिंग प्रकारात अंतिम फेरीपर्यंत मजल मारल्यानंतर स्वप्नील कुसाळे याने कांस्यपदकाची कमाई करत उत्कृष्ट कामगिरी केली. वैयक्तिक पदक मिळवणारा महाराष्ट्रातील तो दुसरा खेळाडू ठरला आहे. पॅरिस येथून स्वप्नील हा आज भारतात परत आला. यावेळी पुणे विमानतळावर स्वप्नीलचे जोरदार स्वागत करण्यात आले.
शिवानी धुमाळ, प्रतिनिधी
पुणे : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला मिळालेल्या तीन पदकांपैकी एक पदक हे कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळे या तरुणाने पटकावले आहे. पॅरिसमधून स्वप्नील आता मायदेशी परतला आहे. यानंतर पुण्यामध्ये त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी स्वप्निलने दगडूशेठ बाप्पाचे दर्शन देखील घेतले.
ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर एअर रायफल शूटिंग प्रकारात अंतिम फेरीपर्यंत मजल मारल्यानंतर स्वप्नील कुसाळे याने कांस्यपदकाची कमाई करत उत्कृष्ट कामगिरी केली. वैयक्तिक पदक मिळवणारा महाराष्ट्रातील तो दुसरा खेळाडू ठरला आहे. पॅरिस येथून स्वप्नील हा आज भारतात परत आला. यावेळी पुणे विमानतळावर स्वप्नीलचे जोरदार स्वागत करण्यात आले.
advertisement
त्यानंतर स्वप्नीलचे बालेवाडी येथे जंगी स्वागत स्वागत झाले. तसेच स्वप्नीलने पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गणपती बाप्पा मोरया, असे म्हणत बाप्पाचं दर्शन घेतले. तसेच आरती केली. यावेळी ट्रस्टकडून स्वप्नीलचा सत्कार करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी, आणि पदाधिकारी उपस्थित होते.
advertisement
बाप्पाने आजपर्यंत जे मागितलं ते दिलं -
advertisement
पुणेकरांनी स्वप्नील कुसाळे याचे धुमधडाक्यात स्वागत केले. गणपती बाप्पांचे दर्शन घेतल्यानंतर बालेवाडीमध्ये त्याची विजयी यात्रा काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने पुणेकर उपस्थित होते. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना स्वप्नील म्हणाला, ‘गणपती बाप्पामुळेच सर्व काही झाले आहे. म्हणून आधी बाप्पाला भेटायला आलो. जे मागितलं आहे, ते बाप्पाने आजपर्यंत दिले आहे,’ असे मत ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळे याने व्यक्त केले. दरम्यान, स्वप्नीलला पाहण्यासाठी यावेळी पुणेकरांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Aug 08, 2024 4:30 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळेचे पुण्यात जोरदार स्वागत, दगडूशेठ गणपतीचेही घेतले दर्शन, म्हणाला...., VIDEO