मिळालेल्या माहितीनुसार, उमेश पवार हे रोजच्या प्रमाणे रात्री घराबाहेर ठेवलेल्या नळावर पाणी भरण्यासाठी गेले होते. परिसरात पाण्याचे मर्यादित वेळेत वितरण होत असल्याने नागरिकांमध्ये पाणी भरताना किरकोळ वाद नेहमीच होत असतात. त्याचप्रमाणे मंगळवारी रात्रीही पाणी भरण्याच्या वाटपावरून पवार यांची शेजारी राहणाऱ्या कुंदा उत्तेकर यांच्यासोबत बाचाबाची झाली. सुरुवातीला किरकोळ भांडणासारखी दिसणारी ही वादावादीने काही मिनिटातच भीषण स्वरुप घेतले.
advertisement
डास मारण्याचा स्प्रे थेट तोंडावर मारला
रागाच्या भरात उत्तेकर यांनी हातात असलेला झुरळ मारण्याचा स्प्रे थेट पवार यांच्या चेहऱ्यावर फवारला.काही मिनिटांतच उमेश पवार जमिनीवर कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. पाणीटंचाईच्या त्रासामुळे शेजाऱ्यांमध्ये वाद होताना लोकं नेहमी पाहतात, पण इतक्या छोट्या कारणावरून जीव घेण्याइतका तणाव वाढू शकतो, ही कल्पनाही कुणी केली नव्हती.
नेमकं काय घडलं?
अर्नाळा सागरी पोलिसांनी आरोपी कुंदा उत्तेकर यांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. मृत उमेश पवार यांचे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. रोजच्या जगण्यातले छोटे-छोटे वाद कधी कधी किती मोठं रूप धारण करू शकतात, याची ही घटना जिवंत उदाहरण ठरली आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये एकच प्रश् “पाणी भरण्याच्या वादाने एखाद्याचा जीव जाऊ शकतो, यापेक्षा मोठा धडा समाजाला आणखी काय हवा?”
जेपी नगर परिसरात मोठी खळबळ
या प्रसंगामुळे जेपी नगर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पाण्यावरून नेहमी होणारे वाद एवढ्या गंभीर स्वरूपात जातील, याची कल्पना कुणालाही नव्हती असे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. शहरातील पाणीपुरवठ्याच्या अनियमिततेमुळे नागरिकांमध्ये तणाव वाढत असल्याचेही काहींनी नमूद केले. दरम्यान, पोलिसांनी या घटनेचा पुढील तपास सुरू असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांवरून बऱ्याच गोष्टी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा:
