'मामा माझ्याशी लग्न कर', आईच्या भावासोबतचं अफेअर; मुंबईला आल्यानंतर भाचीसोब जे घडलं…

Last Updated:

पूजा घरातून बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी तिच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी तपास सुरू केला.

Vasai News
Vasai News
मुंबई :  वसईतील सातवली परिसरात अपहरण झालेल्या मुलीच्या मृत्यूप्रकरणी पोलिस तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. भाचीसोबत प्रेमसंबंध असलेल्या मामानेच तिचा जीव घेतल्याचे निष्पन्न झाले असून आरोपी मामाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला वसई न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत पुजा (काल्पनिक नाव)  हिचे तिचा सख्ख्या मामासोबत गेल्या वर्षभरापासून प्रेमसंबंध होते. पूजा  मामासोबत लग्न करण्यासाठी सतत तगादा लावत असल्याचेही चौकशीत उघड झाले. लग्नावरून दोघांमध्ये अनेक वेळा वादही झाल्याची माहिती समोर आली आहे. १६ नोव्हेंबर रोजी पुजाची आईने वालीव पोलिस ठाण्यात अपहरणाची फिर्याद दाखल केली होती. पूजा घरातून बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी तिच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी तपास सुरू केला.
advertisement

ट्रेनमधून ढकलून दिलं

मामा  एका कंपनीत सुरक्षारक्षाची नोकरी करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी पूजा राहते घर सोडून मामाकडे आली होती. मामा वसईच्या वालीव गावराई पाडा परिसरात राहायला होता. दरम्यान, 17 नोव्हेंबर दुपारी सुमारास मामा आणि भाची हे चर्चगेट–विरार फास्ट लोकलमध्ये प्रवास करत होते. भाईंदर आणि वसई यांच्या दरम्यान गाडी वेगात असताना दोघांमध्ये वाद झाला. या वादाचा शेवट अत्यंत भयावह ठरला. आरोपीनं पुजाला अचानक ट्रेनमधून ढकलून दिले. ती खाली पडून जागीच ठार झाली. घटनेच्या वेळी ट्रेनमध्ये उपस्थित असलेल्या काही प्रवाशांनी तत्काळ आरोपीला पकडून वसई रोड रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. वालीव पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंद असल्याने रेल्वे पोलिसांनी आरोपी मामा याला पुढील कारवाईसाठी वालीव पोलिसांकडे सुपूर्द केले.
advertisement

वसई परिसरात खळबळ

तपासादरम्यान मामा–भाचीच्या प्रेमसंबंधांची माहिती उघड झाल्यानंतर पोलिसांनी खुनासह विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. या संतापजनक घटनेमुळे सातवलीसह वसई परिसरात खळबळ माजली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
'मामा माझ्याशी लग्न कर', आईच्या भावासोबतचं अफेअर; मुंबईला आल्यानंतर भाचीसोब जे घडलं…
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement