गेटवे ते मांडवा जलमार्ग
गेट वे ते मांडवा या जलमार्गावरून दररोज 3 हजारांसून अधिक प्रवासी प्रवास करतात. सुट्टीच्या दिवशी ही संख्या 8 ते 10 हजारांपर्यंत पोहोचते. या सेवेचा पर्यटक आणि स्थानिक प्रवाशांना देखील लाभ होतो. सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत पीएनपी, मालदार आणि अंजठा या खाजगी कंपन्यांच्या बोटी प्रवाशांसाठी उपलब्ध असतात. परंतु, आता 3 महिने या बोटी बंद राहणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागेल.
advertisement
मोठी बातमी! आता अटल सेतू होणार टोल फ्री! या वाहनांना राज्य सरकारने दिली सूट
पर्यायी मार्ग कोणते?
रस्त्याने अलिबागला जाण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मुंबई-अलिबाग दरम्यान नियमित व एसी एसटी बस सेवा चालू असते, जी किफायतशीर आणि सोयीची मानली जाते. तसेच, नवी मुंबईतील बेलापूरपर्यंत लोकल ट्रेनने जाऊन पुढे अलिबागसाठी बस किंवा टॅक्सीने प्रवास करता येतो. याशिवाय, दादरहून थेट टॅक्सी किंवा कॅब भाड्याने घेऊन अलिबागपर्यंत पोहोचता येते. स्वतःची कार असलेल्या प्रवाशांसाठी ड्राइव्ह करणे हा एक स्वयंपूर्ण पर्याय आहे.
रो रो सेवा सुरू राहणार
गेट वे ते मांडवा ही फेरी सेवा बंद असली तरी ‘मांडवा ते भाऊचा धक्का’ दरम्यानची ‘रो-रो’ सेवा मात्र सुरू राहणार आहे. या सेवेचा पर्यटक आणि स्थानिक प्रवासी लाभ घेऊ शकतील. पावसाळा संपल्यानंतर सप्टेंबर 2025 पासून ही जलप्रवासी सेवा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात गेट वे ऑफ इंडिया ते अलिबागमधील मांडवा दरम्यानची वाहतूक थांबवली जाते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर वादळी वारे आणि जोरदार पावसाचे वातावरण आहे. त्यामुळे यंदा ही सेवा नियोजित वेळेपेक्षा पाच-सहा दिवस आधीच बंद करण्यात येत आहे.