स्मोक कर सकते है क्या?
इंडिगो एअरलाईन्सच्या दुबई ते मुंबई विमानात 20 एप्रिल रोजी धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. विमान सुरू होण्यापूर्वी धूम्रपान बंदीची सूचना देण्यात आली होती. तेव्हाच एका प्रवाशाने ‘फ्लाइट पर स्मोक कर सकते है क्या?’ असा प्रश्न केला. विमानात धूम्रपान करण्यास बंदी असून कारवाई होऊ शकते, असे सांगण्यात आले. परंतु, विमान मुंबईला पोहोचण्याच्या आधीच विमानाच्या टॉयलेटमधून सिगारेच्या धुराचा वास येऊ लागला. केबीन क्रूने टॉयलेटचा दरवाजा उघडला असता आत धूर भरल्याचे दिसले.
advertisement
लायटर गायब?
कमलजीत आणि कोमलजीत सिंग यांनी विमानाचे कप्तान जयकृष्ण नायर (51) यांच्याकडे टॉयलेटमध्ये सिगारेट प्यायल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून विमानतळावर उतरताच सिगारेटचे पाकीट जप्त करण्यात आले. मात्र, लायटर किंवा माचिस सापडले नाही. त्यामुळे ते विमानातील इतर साथीदारांकडे दिल्याचा संशय आहे. सहारा पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन अधिक तपास सुरू केला आहे.
इसलिये स्मोक किया
विमानात धूम्रपान केल्याची कबुली दोघा प्रवाशांनी दिली. त्यांच्याकडे चौकशी केली असता “वहाँ पे लिखा था, यहाँ पे स्मोक अलाउड है, इसिलिये मैंने स्मोक किया,” असे स्पष्टीकरण एकाने दिले. तर दुसऱ्यानेही तिथेच जाऊन धूम्रपान केल्याचे सांगितले. परंतु, ‘सॉरी फिरसे नहीं होगा’ अशा शब्दांत त्याने माफी मागितली.
