सर्वप्रथम “चीज कॉर्न ऑम्लेट” ही झटपट रेसिपी बनवण्यासाठी लागणारे साहित्य जाणून घेऊया. दोन अंडी, दोन ब्रेडचे स्लाईस, एक चीज क्यूब, थोडं बटर, बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो, उकडलेले मक्याचे दाणे, मीठ, तिखट आणि मसाला चवीनुसार आणि आवडीप्रमाणे कोथिंबीर असं साहित्य या रेसिपीसाठी लागतंय. अवघ्या काही मिनिटातच बनणारी ही रेसिपी आपल्या चिमुकल्यांच्या नक्कीच तोंडाचे चोचले पूर्ण करणार हे नक्की. अवघ्या काही मिनिटातच हा चमचमीत पदार्थ बनणारा आहे. या पदार्थासाठी तुम्हाला जवळपास 10 ते 15 मिनिटांचा कालावधी लागेल. जर तुमच्याकडे साहित्यामध्ये सांगितलेले सर्व पदार्थ असतील तर, अवघ्या काही मिनिटातच हा पदार्थ बनून तयार असेल.
advertisement
“चीज कॉर्न ऑम्लेट” या पदार्थाचे साहित्य जाणून घेतल्यानंतर त्याची सोपी आणि चविष्ट रेसिपी जाणून घेऊया. सर्वप्रथम दोन अंडी फोडून एका बाऊलमध्ये घ्या. त्यात मीठ, तिखट, मसाला, कांदा, टोमॅटो आणि मक्याचे दाणे टाकून चांगलं फेटून घ्या. गरम तव्यावर थोडं बटर पसरवा आणि ऑम्लेट बनवायला सुरुवात करा. आता त्यावर दोन ब्रेडचे स्लाईस ठेवा आणि उलट सुलट करून दोन्ही बाजूंनी भाजून घ्या. ऑम्लेट दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगाचं झालं की ते ताटात काढा. शेवटी किसलेलं चीज वरून टाका आणि गरम ऑम्लेटवर टाकल्यामुळे चीज लगेच वितळतं आणि नंतर त्या ऑम्लेटला मिळतो ‘चीजचा’ परफेक्ट ट्विस्ट. अवघ्या काही मिनिटातच “चीज कॉर्न ऑम्लेट” पदार्थ बनून रेडी होईल. फक्त चिमुकल्यांनाच नाही तर, सर्वच वयोगटातल्यांना आवडणारा पदार्थ आहे.