भारतीय डाक विभाग दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्षाबंधन विशेष लिफाफा (Raksha Bandhan Special Envelope) उपलब्ध करून देत आहे. फक्त 12 रुपयांमध्ये मिळणारा हा लिफाफा पूर्णपणे वॉटरप्रूफ असून, राखी सुरक्षितरीत्या पोहोचवण्यासाठी विशेषतः डिझाइन करण्यात आलेला आहे.
Ganeshotsav 2025: गणपती विसर्जन करा पण, नियमात राहूनच, काय आहेत कोर्टाचे आदेश?
लिफाफ्याचे वैशिष्ट्य
1) वॉटरप्रूफ आणि टिकाऊ साहित्याचा वापर.
advertisement
2) राखी, छोटा संदेश किंवा शुभेच्छा कार्ड सुरक्षित ठेवण्याची सोय.
3) देशभरात कुठेही पाठवता येण्याची सुविधा.
4) सामान्य पोस्टच्या तुलनेत राखीसाठी योग्य आकार व जाडी.
5) तीन ते चार दिवसांत राखी पोहोचण्याची खात्री.
भारतीय पोस्टचे हे राखी एन्व्हलप देशातील सर्व प्रमुख डाक कार्यालयांमध्ये उपलब्ध आहे. राखी पाठवण्यासाठी वेगळे पार्सल करण्याची आवश्यकता नसून, या लिफाफामधूनच राखी सोप्या पद्धतीने आणि अत्यंत कमी खर्चात पाठवता येते.
पोस्ट विभागाने नागरिकांना लवकर राखी पाठवण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून ती वेळेवर आणि सणाच्या दिवशी भावाच्या हातात पोहोचू शकेल. सध्या श्रावण महिना सुरू असून पोस्ट कार्यालयांमध्ये राखी पाठवण्यासाठी गर्दी वाढण्याची शक्यता आहे.