रिलायन्सच्या या उपक्रमाचा उद्देश आहे, पशुधनाचं संरक्षण, अन्न आणि जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता सुनिश्चित करणं तसंच सार्वजनिक आरोग्य जोखमींचे व्यवस्थापन करणं.
पशुधन संरक्षणावर भर
सोलापूर जिल्ह्यातील पशुधनाच्या आरोग्यासाठी रिलायन्स फाउंडेशन आणि जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने पशुवैद्यकीय शिबिरं आयोजित केली गेली. उपचार आणि औषधोपचाराबरोबरच पुरानंतर पसरणाऱ्या हॅमरेजिक सेप्टीसीमिया आणि ब्लॅक क्वार्टर (HS-BQ) सारख्या जीवघेण्या आजारांपासून संरक्षणासाठी 22000 जनावरांना लसीकरण करण्यात आलं. यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या जोखीम मूल्यांकनावर आधारित HS-BQ लस पुरवण्यात आल्या.
advertisement
याशिवाय सर्वाधिक प्रभावित पशुपालकांना चाऱ्याची कमतरता भरून काढण्यासाठी सायलेज बॅग्ज वाटप करण्यात आल्या. बीड जिल्ह्यात पशुपालक कुटुंबांच्या उपजीविकेचं संरक्षण करण्यासाठी वैद्यकीय शिबिरे आयोजित केली जात आहेत.
अन्न, स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य सहाय्य
सोलापूरमध्ये पुरामुळे विस्थापित झालेल्या अनेक कुटुंबांना खुल्या जागेत किंवा सामायिक समुदाय स्थळी राहावं लागलं. त्यांच्या अन्न आणि पोषणाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी रिलायन्स फाउंडेशनने सामुदायिक स्वयंपाकगृहांना आवश्यक वस्तूंचा पुरवठा करून पौष्टिक जेवणाची व्यवस्था केली.
पुरामुळे पिण्याच्या पाण्याची उपलब्धता बाधित झाल्याने सार्वजनिक आरोग्य जोखमी वाढल्या होत्या. यावर उपाय म्हणून रिलायन्स फाउंडेशनने प्रभावित गावांमध्ये पाणी शुद्धीकरण यंत्रणांच्या दुरुस्ती आणि पुनर्बांधणीसाठी उपक्रम हाती घेतला आहे. घरगुती स्तरावर, वैयक्तिक आणि मासिक पाळी स्वच्छतेसाठी साहित्य तसंच ओरल रिहायड्रेशन सॉल्ट्स असलेली स्वच्छता किट्स कुटुंबांना पुरवली जाणार आहेत, ज्यामुळे जलजन्य आजारांना प्रतिबंध करता येईल.
महाराष्ट्राच्या मध्यभागी आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीने आम्ही अत्यंत व्यथित आहोत. सोलापूर आणि बीडमधील प्रभावित कुटुंबांना या कठीण काळातून सावरण्यासाठी आणि त्यांचं आयुष्य पुन्हा उभं करण्यासाठी रिलायन्स फाउंडेशन पूर्णपणे वचनबद्ध आहे, असं रिलायन्स फाउंडेशनच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.
रिलायन्स नेहमीच देशाच्या सोबत उभा राहिला आहे. विशेषतः संकटाच्या काळात. पंजाब, आसाम आणि उत्तराखंडसह अनेक राज्यांतील पुरांमध्ये रिलायन्सने तत्काळ प्रतिसाद देत स्थानिक पातळीवर मदतकार्य केलं आहे. अशा उपक्रमांमुळे फक्त वेळेवर दिलासा मिळत नाही, तर समुदायांना नव्या आशा आणि बळासह पुन्हा उभं राहण्यास मदत मिळते.